तुमच्या बँक खात्यातून ५००० किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम अचानक वजा केली जाणार नाही. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने अशी प्रणाली बनवली आहे की बँका ५००० किंवा त्याहून अधिक रकमेचे ऑटो डेबिट व्यवहार स्वतः करू शकणार नाहीत. १ ऑक्टोबर २०२१ पासून लागू करण्यात आलेली ही व्यवस्था बँक ग्राहकांना खूप उपयोगी पडेल. तज्ज्ञांचे मत आहे की, आरबीआयने अशा प्रकारची व्यवस्था करून ग्राहकांचा त्रास कमी केला आहे. या व्यवस्थेचे नाव प्रमाणीकरणाचे अतिरिक्त घटक ( additional factor of authentication) असं आहे.

सिक्युरिटीजचे सीएफपी,हर्षवर्धन रुंगटा यांच्या मते, “नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम किंवा इतर तत्सम प्लॅटफॉर्मवर अनेक वेळा असे घडते की, ग्राहक प्लॅन घेताना तेथे त्यांचे बँकिंग तपशील देतात. याव्यतिरिक्त, हे प्लॅटफॉर्म ग्राहकाकडून ही संमती देखील घेते. आपण असे गृहीत धरू की योजनेची मुदत संपल्यानंतर आपोआप नूतनीकरण होईल. त्याचे शुल्क त्यांच्या खात्यातून स्वयं डेबिट केले जाईल. लहान रकमेचे ऑटो डेबिट करणे इतके कष्टाचे नाही, परंतु मोठ्या प्रकरणांमध्ये ते बँक ग्राहकांच्या अडचणी वाढवते. “

रुंगटा यांच्या मते, “अशी काही प्रकरणे RBI कडे आली होती ज्यात ऑटो डेबिट प्रणालीसंदर्भात काही नियम बनवण्याची शिफारस करण्यात आली होती. यानंतर RBI ने गेल्या वर्षी AFA आणण्याचा प्रस्ताव दिला होता. पण बँक या व्यवस्थेसाठी तयार न्हवत्या. हे लक्षात घेऊन RBI ने ३० सप्टेंबर पर्यंत वेळ दिला होता. आता १ ऑक्टोबर पासून बँका ५००० किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम ऑटो-डेबिट फक्त ग्राहकांची एसएमएस किंवा ईमेल द्वारे संमती घेतल्यानंतरच करेल . यासाठी बँक ग्राहकांना OTP पाठवेल. “

स्टैंडिंग इंस्ट्रक्शन म्हणजे काय?

बँकिंग भाषेत, याचा अर्थ असा की जर आपल्याला इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर कोणतेही युटिलिटी बिल, विमा प्रीमियम किंवा कोणतेही आवर्ती पेमेंट करायचे असेल तर ते एकदा ग्राहकाने स्थायी निर्देश दिल्यावर केले जाईल. यासाठी बँकेला त्यांना पुन्हा पुन्हा विचारण्याची गरज भासणार नाही. आरबीआयने या प्रणालीचे अधिक प्रमाणीकरण केले आहे. १ ऑक्टोबरपासून बँका अशा पेमेंटपूर्वी ग्राहकांना कळवतील.

रुंगटाच्या मते, “ही व्यवस्था ५००० रुपयांच्या वरच्या व्यवहारासाठी आहे. यापेक्षा कमी रकमेसाठी ती लागू होईल की नाही याबाबत कोणतीही स्पष्ट सूचना नाही. येत्या काही दिवसात परिस्थिती स्पष्ट होईल.” बँकांनी ग्राहकांना एसएमएस किंवा ईमेल द्वारे हे सांगण्यास सुरुवात केली आहे.