तब्बल 6000mAh ची बॅटरी; रिअलमीने लाँच केले दोन दमदार ‘बजेट’ स्मार्टफोन, किंमत फक्त…

कमी किंमतीत शानदार फीचर्स

स्मार्टफोन कंपनी रिअलमीने भारतात आपले दोन नवीन बजेट स्मार्टफोन Realme C15 आणि C12 लाँच केले आहेत. Realme C12 ची किंमत कंपनीने 8,999 रुपये ठेवली आहे. तर, Realme C15 ची किंमत 9,999 रुपयांपासून सुरू होते. रिअलमी सी15 आणि सी12 या दोन्ही फोनचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कंपनीने तब्बल 6000mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली आहे. रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट आणि फिंगरप्रिंट सपोर्ट यांसारखे फीचरही या फोनमध्ये आहेत.

Realme C12 हा फोन कंपनीने 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. हा स्मार्टफोन तुम्ही 24 ऑगस्टपासून Realme.com वर खरेदी करु शकतात. तर, कंपनीने रिअलमी C15 हा फोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 9,999 रुपये आहे. याशिवाय 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 27 ऑगस्टपासून फ्लिपकार्ट आणि Realme.com वर खरेदीसाठी उपलब्ध असेल. याशिवाय लवकरच ऑफलाइन स्टोअर्समध्येही या दोन्ही फोनची विक्री होईल.

Realme C15: स्पेसिफिकेशन्स-
या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच मिनी-ड्रॉप (720×1,600 पिक्सेल) डिस्प्ले असून सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास आहे. ड्युअल सिम कार्ड सपोर्ट असलेला हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित रिअलमी यूआयवर कार्यरत आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G35 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी GE8320 GPU आहे. या फोनसाठी 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज व 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असे दोन व्हेरिअंट आहेत. इनबिल्ट स्टोरेज माइक्रोएसडी कार्डद्वारे वाढवण्याचा पर्यायही आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप (13MP + 8MP + 2MP + 2MP) आहे. तर, सेल्फीसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. याशिवाय कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 5.0, 4जी, जीपीएस, ग्लोनास आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक आहे. तसेच 18 W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 6000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. पॉवर ब्लू आणि पॉवर सिल्वर अशा दोन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध आहे. Realme C15 च्या 3GB रॅम व्हेरिअंटची किंमत 9,999 रुपये आणि 4GB रॅम व्हेरिअंटची किंमत 10,999 रुपये आहे.

Realme C12: स्पेसिफिकेशन्स-
रिअलमी सी12 हा फोन अँड्रॉइड 10 आधारित रिअलमी यूआयवर कार्यरत असून यामध्ये 6.5 इंच एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन देण्यात आले आहे. ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसर या फोनमध्ये असून 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे. इनबिल्ट स्टोरेज माइक्रोएसडी कार्डद्वारे वाढवण्याचा पर्याय आहे. फोटोग्राफीसाठी रिअलमी सी12 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप (13MP + 2MP + 2MP) आहे. तर, सेल्फीसाठी यामध्ये 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळेल. 10 W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली तब्बल 6,000 एमएएच क्षमतेची बॅटरी यामध्ये आहे. शिवाय कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ, वाय-फाय, जीपीएस, माइक्रो युएसबी पोर्ट आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक आहे. Realme C12 च्या मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर हे फीचर देण्यात आलं आहे. 8,999 रुपये इतकी Realme C12 ची किंमत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Realme c12 and c15 launched in india check price and specifications sas