स्मार्टफोन कंपनी रिअलमीने (Realme)आपला नवीन बजेट फोन Realme C3 लाँच केलाय. हा फोन म्हणजे रिअलमी C2ची पुढील आवृत्ती आहे. हा फोन दोन व्हेरिअंटमध्ये (3GB रॅम + 32GB स्टोरेज आणि 4GB रॅम +64GB स्टोरेज) लाँच करण्यात आला आहे.ड्युअल रिअर कॅमेरा, MediaTek Helio G70 प्रोसेसर असलेल्या या एंट्री लेवलच्या फोनमध्ये इनबिल्ट डार्क मोड आणि रिव्हर्स चार्जिंग यांसारखे फीचर्सही आहेत.

रिअलमी UIसोबत अँड्रॉइड 10 वर आधारित असलेला हा कंपनीचा पहिलाच स्मार्टफोन आहे. हा फोन केवळ Android 10 ऑपरेटिंग सिस्टिमसोबत येतो असं नाही, तर यामध्ये MediaTek Helio G70 प्रोसेसरही आहे. फोनमध्ये इनबिल्ट डार्क मोड आहे. फ्लिपकार्टवरुन १२ फेब्रुवारी रोजी हा फोन खरेदी करता येईल. दुपारी 12 वाजेपासून या फोनच्या विक्रीसाठी फ्लिपकार्टवर विशेष सेलचं आयोजन केलं जाणार आहे. याशिवाय कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरुनही फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल.

फीचर्स-
या फोनमध्ये 6.5 इंचाचा वॉटर-ड्रॉप स्टाइल नॉच डिस्प्ले असून कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन आहे. यात ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G70 एसओसी प्रोसेसर मिळतं. 32जीबी/64जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या फोनमध्ये 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी असून रिव्हर्स चार्जिंग फीचरही आहे. फोटोग्राफीसाठी मागील बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप (12 + 2 MP) देण्यात आलाय, तर सेल्फीसाठी 5 मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेरा आहे.

आणखी वाचा – स्वस्त झाला शानदार Galaxy A70s, सॅमसंगकडून किंमतीत कपात

रिअलमी C3 ची किंमत –
हा फोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यातील 3GB + 32GB व्हेरिअंटची किंमत 6,999 रुपये, तर 4GB +64GB व्हेरिअंटची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे.