Realme Watch खरेदी करण्याची आज संधी, सेलमध्ये मिळतील आकर्षक ऑफरही

गेल्या महिन्यात लाँच झालेल्या Realme Watch साठी आज भारतात पहिल्या सेलचं आयोजन

गेल्या महिन्यात लाँच झालेल्या Realme Watch साठी आज भारतात पहिल्या सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी १२ वाजेपासून फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या संकेतस्थळावर सेलसाठी सुरूवात झाली आहे. 3,999 रुपये किंमत असलेल्या या वॉचमध्ये 2.5D कर्व्ह्ड ग्लाससह कलर डिस्प्ले आणि टचस्क्रीन सपोर्ट आहे. सेलमध्ये या वॉचच्या खरेदीवर काही शानदार ऑफरही आहेत.

आर्मी ग्रीन, ब्लॅक, ब्लू आणि रेड अशा चार कलरच्या ऑप्शनमध्ये हे वॉच उपलब्ध असून सेलमध्ये कॅशबॅक आणि इंस्टंट डिस्काउंटचा फायदा मिळू शकतो. हे वॉच फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 5 टक्के कॅशबॅक आणि अ‍ॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 10 टक्के डिस्काउंट मिळेल.

स्पेसिफिकेशन्स :-
रिअलमी वॉचमध्ये 1.4 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले असून डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी 2.5D कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 आहे. वॉचमध्ये तीन अ‍ॅक्सिस-अ‍ॅक्सेलरोमीटर आणि एक PPG सेंसर आहे. IP68 रेटिंग असल्याने हे वॉच डस्ट आणि वॉटरप्रूफ आहे. अँड्रॉइड 5 आणि त्यापेक्षा वरील ओएसला हे वॉच सपोर्ट करतं. वॉच आणि फोनच्या कनेक्शनसाठी रिअलमी लिंक अ‍ॅपची गरज असते. 160mAh क्षमतेची बॅटरी यात असून पावर सेविंग मोडही आहे. या मोडमध्ये वॉच एकदा चार्ज केल्यानंतर 20 दिवसांचा बॅकअप मिळेल असा कंपनीचा दावा आहे. याशिवाय, 14 निरनिराळे स्पोर्ट्स मोड असून स्लीप मॉनिटरिंग, हायड्रेशन रिमाइंडर आणि मेडिटेशन रिलॅक्सिंग यांसारखे फीचर्सही आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Realme watch first sale in india via flipkart realme website know price in india specifications sas

Next Story
एचआयव्ही परिक्षणाने भारतात वाचतील लाखो प्राण