चीनच्या Realme कंपनीने भारतात Realme X हा स्मार्टफोन दोन दिवसांपूर्वीच भारतात लाँच केला आहे. आज फ्लिपकार्टच्या अधिकृत संकेतस्थळावर या स्मार्टफोनसाठी पहिल्या सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. रात्री 8 वाजेपासून Hate-to-Wait या सेलमध्ये हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असेल.

ऑफर –

या सेलमध्ये एसबीआय बँकेच्या ग्राहकांना 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल, तर एक्सिस बँकेच्या कार्डचा वापर केल्यास 5 टक्के सवलत मिळेल. नो कॉस्ट इएमआयचा पर्याय देखील ग्राहकांसाठी असेल.

Realme X मध्ये 6.53 इंचाचा FHD+ नॉचलेस सुपर AMOLED डिस्प्ले आहे. यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चं सुरक्षाकवच असून पोलर व्हाइट आणि स्पेस ब्ल्यू अशा दोन रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध असेल. मागील बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप असून यातील एक कॅमेरा 48 मेगापिक्सल आणि दुसरा 5 मेगापिक्सलचा आहे. कॅमेऱ्यात Sony IMX586 सेंसरचा वापर करण्यात आलाय. सेल्फीसाठी या फोनमध्ये Sony IMX471 सेंसरसह 16 मेगापिक्सलचा AI पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रैगन 710AIE प्रोसेसर आहे. हा फोन पूर्ण चार्ज होण्यासाठी 78 मिनिटांचा वेळ लागतो असा कंपनीचा दावा आहे.

Realme X फीचर्स –

डिस्प्ले : 6.53 इंच
प्रोसेसर : क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710
फ्रंट कॅमेरा : 16-मेगापिक्सल
रियर कॅमेरा : 48-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सल
रॅम : 8 जीबी
स्टोरेज : 128 जीबी
बॅटरी क्षमता : 3765 एमएएच
ओएस : अँड्रॉइड
रिझोल्यूशन :  1080

किंमत –
Realme X – 4GB रॅम+128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 16 हजार 999 रुपये, तर 8GB रॅम+128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 19 हजार 999 रुपये आहे.