scorecardresearch

Health Tips : पोटातून येणारा गुडगुड आवाज गंभीर आजारांचं लक्षण ठरू शकतं! ‘हे’ पदार्थ खाणं ताबडतोब सुरू करा

अनेकदा अनेकांच्या पोटातून गुडगुड आवाज येत असतो. अशा स्थितीत भूक लागल्याने हा प्रकार येत असल्याचा अनेकांचा समज असतो. मात्र, कधी कधी हा आवाज थांबत नाही. अशा परिस्थितीत अशा आवाजाला अजिबात हलक्यात घेऊ नका.

Stomach-Sound

अनेकदा अनेकांच्या पोटातून गुडगुड आवाज येत असतो. अशा स्थितीत भूक लागल्याने हा प्रकार येत असल्याचा अनेकांचा समज असतो. मात्र, कधी कधी हा आवाज थांबत नाही. शरीराला अन्न दिल्यानंतरही पोटातून गुडगुड आवाज येत राहतो. अशा परिस्थितीत अशा आवाजाला अजिबात हलक्यात घेऊ नका. कारण हा आवाज पोटाशी संबंधित आजारांचं लक्षण आहे. वैद्यकीय भाषेत या गुडगुड आवाजाला पोट गुरगुरणे असे म्हणतात.

या प्रकारच्या आवाजाचा संबंध अन्नाच्या पचनाशी असतो. हा आवाज पचनाच्या वेळी पोटातून आणि आतड्यांमधून येतो असं मानलं जातं. आतडे रिकामे असल्याने अन्न आणि पाणी तिथून जात असताना असा आवाज येतो. जरी हे सामान्य मानले जात असले तरी, ओटीपोटातून वारंवार असाधारणपणे मोठा आवाज येणं हे पाचन तंत्रातील गंभीर स्थितीचं लक्षण असू शकतं.

आणखी वाचा : Beauty Tips : मान काळी पडलीय? ‘हा’ घरगुती उपाय करा, नक्की होईल फायदा

या दोन कारणांनी पोटात गुडगुड आवाज येतो
अहवालानुसार, जेव्हा अन्न लहान आतड्यात पोहोचते, तेव्हा शरीर अन्न तोडण्यासाठी आणि पोषक द्रव्ये शोषण्यासाठी एंजाइम सोडते. पचनाच्या या प्रक्रियेदरम्यान असा आवाज येऊ शकतो. त्याच वेळी, भूक हे आणखी एक मोठे कारण असू शकते.

आणखी वाचा : Hair Care Tips : हिवाळ्यात केस गळणे लगेच कमी होईल, हे सोपे घरगुती उपाय नक्की वापरून पाहा

या कारणांमुळेही गुडगुडचा आवाज येतो
भूक आणि पचन हे गुडगुड आवाज येण्यामागचं दोन सामान्य कारणे आहेत, परंतु जेव्हा हा आवाज थांबत नाही, तेव्हा समजा की हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण आहे. अशा आवाजामागे आणखी काही कारण असू शकते. क्रोहन रोग, अन्न ऍलर्जी, अतिसार, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रक्तस्त्राव मोठ्या आतड्यात जळजळ झाल्यामुळे अशा प्रकारचे आवाज देखील होऊ शकतात. अशा परिस्थितीत, आपण त्वरित तपासणी करणे आवश्यक आहे. आवाजासोबतच पोटात आणखी काही त्रास जाणवत असेल, तर डॉक्टरांशी संपर्क करणे चांगले.

आणखी वाचा : Health Tips : हिवाळ्यात लहान मुलांच्या बोटांना सूज येते? मग हे घरगुती उपाय करा

गुडगुड आवाज थांबवण्यासाठी काय करावे?

  • अधिकाधिक पाणी प्यावे. पोटदुखी थांबवण्यासाठी एक ग्लास पाणी गुणकारी मानलं जातं. पाणी भरण्यासोबतच ते पचनासही मदत करते.
  • पोट रिकामे असताना गुडगुड आवाज येतो असं मानलं जातं. अशा स्थितीत लगेच काहीतरी खावे. खाल्ल्याने हा आवाज थांबू शकतो.
  • यासोबतच पुदिना, आले आणि बडीशेप यापासून बनवलेला हर्बल चहा तुमच्या पचनाला मदत करू शकतो आणि तुमच्या आतड्यांसंबंधी स्नायूंना आराम देऊ शकतो.
  • गुडगुड आवाज आल्यावर तुम्ही ही युक्ती वापरू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Reasons for stomach sound know treatment for better life prp

ताज्या बातम्या