‘सिंगल’ असण्याची काही धम्माल कारणे..

‘गर्लफ्रेंड’ किंवा ‘बॉयफ्रेंड’ असणे खरेच गरजेचे आहे का?

कोणत्याही नात्यात स्वत:ला गुंतवून ठेवणे, ‘गर्लफ्रेंड’ किंवा ‘बॉयफ्रेंड’ असणे खरेच गरजेचे आहे का? मित्रमैत्रिणींची ‘प्रेमळ’ नाती पाहीली की, अनेक ‘सिंगल’ पात्रांना त्यांचा सहाजिकच हेवा वाटतो. काहीजण मात्र याला अपवाद ठरतात. आपल्या ‘सिंगल’ असण्याची त्यांना जराशीही खंत नसते. उलटपक्षी अनेकांसाठी एकटी, उदास असणारी ही मंडळी ‘सिंगल’ असण्याची अशी काही धम्माल कारणे देतात की, ‘रिलेशनशिप’मध्ये असणाऱ्यांनाही त्यांचा हेवा वाटू लागतो. ही आहेत एकटेपणाचा हेवा वाटणारी काही कारणे….
१. ‘सिंगल’ असण्याचा एक फायदा म्हणजे ‘व्हॉट्सअॅप’वर बराच वेळ तुमचा मेसेज कोणी वाचला आहे की नाही हे दर्शवणारी निळ्या रंगाची ‘टीक’ येइपर्यंत तुम्हाला रात्रभर वाट पाहण्याची गरज नाही.
२. ‘रिलेशनशिप’मध्ये असणाऱ्यांच्या तुलनेने ‘सिंगल’ असणाऱ्यांकडे वेळ आणि गरज पडल्यास जास्त पैसे असतात.
३. मोबाइलचे बिल सहसा आटोक्यातच असते. (ही अनेकांसाठी गर्वाची बाब असते.)
४. तुमच्या साथीदाराच्या ‘अतरंगी’ मित्रमैत्रीणीसोबत तुमच्या मनाव्यतिरीक्त फिरण्याची तक्रार नसते.
५. सोशल नेटव्हर्किंग साइट्सवर स्टेटस आणि कमेंट्समध्ये ‘बीएइ- (बीफोर एनीवन एल्स)’ सारखे विचित्र आणि कधीकधी न कळणारे शब्द लिहिण्याची काही गरज नसते.
६. तुम्ही कधीही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कितीही मज्जा-मस्करी करु शकता, ते ही कोणाच्या परवानगी शिवाय
७. तुम्ही हवा तो चित्रपट, हव्या त्या चित्रपटगृहात किंवा घरी कधीही पाहू शकता.
८. तुमच्या विचित्र वागण्याबद्दल कधीही इतरांना स्पष्टीकरण देण्यासाठी तुम्ही बांधील नसता
९. शेवटचे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे काही वायफळ गोष्टींमध्ये वेळ दवडण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आवडीच्या आणि महत्त्वाच्या कामांमध्ये स्वत:ला व्यस्त ठेवू शकता.
आता ही कारणे वाचल्यावर विचारविनिमय झाला असेल तर, कोणता मार्ग निवडायचा हे ज्याचे त्यानेच ठरवावे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Reasons why i am single

ताज्या बातम्या