Recipe: लसणाचे सेवन पोटासाठी फायदेशीर, जाणून घ्या पराठ्याची रेसिपी

लसूण आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो.

Garlic Paratha Recipe
(फोटो: Freepik )

Garlic Paratha Recipe: जेवणात लसूण असले की जेवणाला चव येते. भारतीय जेवणात तर आवर्जून लसणाचा वापर करतात. लसूण आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो. सकाळी लवकर लसणाचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या दूर होतात, तसेच हाडे मजबूत करण्याचेही काम करते. याशिवाय लसूण फ्लूच्या संसर्गापासून बचाव करतो.

साहित्य:

 • ३ कप मैदा
 • १ चमचा लसूण पेस्ट
 • २ चमचे तेल
 • १ टीस्पून मीठ
 • १ आणि १/२ कप गरम पाणी

(हे ही वाचा: रात्री फळं खावीत का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या योग्य वेळ)

लसूण बटरसाठी

 • ३ चमचे मेल्ट केलेलं बटर
 • २ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
 • १ टीस्पून लसूण पेस्ट (किसलेली)
 • १/४ टीस्पून मीठ
 • १ टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

(हे ही वाचा: Diabetes : मेथी दाणे साखर नियंत्रित ठेवण्यासाठी करतात मदत, जाणून घ्या फायदे)

लसूण पराठा कसा बनवायचा?

 • लसूण पराठा किंवा लसूण लच्छा पराठा बनवण्यासाठी एका भांड्यात पीठ घ्या.
 • पिठात लसूण पेस्ट, तेल आणि मीठ घालून मिक्स करा.
 • यानंतर थोडे थोडे गरम पाणी घालून चमच्याने मिसळा.
 • ५ मिनिटे राहू द्या म्हणजे पिठात ओलावा येईल.
 • ५ मिनिटांनी पीठ मळून घ्या.
 • पिठावर एक चमचा तेल लावा आणि १५-२० मिनिटे ठेवा.
 • लसूण पराठ्याचे पीठ तयार झाल्यावर त्यात लसूण बटर लावून तयार करा.
 • यासाठी एका भांड्यात लोणी, लसूण पेस्ट, मीठ, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून नीट मिक्स करा.
 • पिठाचे समान गोळे घ्या.
 • एक गोळा घेऊन त्यावर पीठ शिंपडून पातळ लाटून घ्या.
 • या रोटीवर लसूण पीठ लावून थोडे पीठ शिंपडा.
 • आता ही रोटी लच्छा पराठ्याप्रमाणे एका थरात गोळा करा.
 • पीठ गोलाकार करून थर तयार करून घ्या.
 • त्यावर थोडं पीठ लावून जाडसर पराठा लाटून घ्या.
 • तव्यावर पराठा ठेवून दोन्ही बाजूंनी तूप लावून चांगले बेक करावे.
 • बाकीचे पराठे पण अशा प्रकारे बनवा.
 • आवडत्या चटणीसोबत लसूण लच्छा पराठा खा आणि सर्व्ह करा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Recipe garlic is beneficial for the stomach know the recipe of paratha ttg

Next Story
Garlic Soup Recipe: रेस्टॉरंट स्टाईलमध्ये लसूण सूप बनवा घरच्या घरी; जाणून घ्या रेसिपी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी