जर तुम्हाला रोजच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल आणि तुम्हाला काहीतरी वेगळं खावंसं वाटत असेल तर तुम्ही कच्च्या केळी आणि टोमॅटोची मसालेदार भाजी बनवू शकता. कच्च्या केळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि बी६ असते, जे आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे ही भाजी आरोग्य आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते. जाऊन घ्या भाजी बनवण्यासाठी लागणार साहित्य आणि कृती…

साहित्य काय हवं?

कच्ची केळी, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, दही, जिरे, मीठ, मिरची पावडर, हळद पावडर, धणे पावडर, ताजी काळी मिरी, गरम मसाला पावडर, तूप

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Gold Silver Price on 19 April 2024
Gold-Silver Price on 19 April 2024: सोन्याच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्याचं बजेट बिघडवलं, जाणून घ्या १० ग्रॅमचा दर
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?

(हे ही वाचा: Health Tips: ‘या’ ५ गोष्टी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका; बिघडू शकते तब्येत)

पूर्वतयारी

कच्च्या केळी-टोमॅटोच्या भाजीसाठी, प्रथम कच्ची केळी धुवून सोलून घ्या. त्याचे लहान गोल तुकडे करा. यानंतर टोमॅटोचे छोटे तुकडे करा. यासोबत हिरवी मिरची आणि हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.

(हे ही वाचा: मधुमेहींसाठी ‘हे’ फळ आहे खूप फायदेशीर, रक्तातील साखर करते नियंत्रित)

कृती

भाजी बनवण्यासाठी कुकरमध्ये तूप गरम करून त्यात जिरे टाका. नंतर जिरे तडतडल्यावर त्यात हिरवी मिरची आणि टोमॅटो टाकून चांगले परतून घ्या. टोमॅटो मऊ झाल्यावर त्यात मीठ, लाल तिखट, हळद, धनेपूड घाला. आता ५ ते ७ मिनिटे शिजवा आणि नंतर त्यात थोडं दही घालून मिक्स करा. आता त्यात चिरलेली केळी टाका आणि नंतर थोडे पाणी घालून कुकरचे झाकण लावा. २ ते ३ शिट्ट्या झाल्यावर भाजी तयार होईल. शिजवून थंड झाल्यावर भाजीत गरम मसाला आणि काळी मिरी पावडर घाला. तुम्ही मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणीही देऊ शकता. जर गरम मसाला घरगुती असेल तर तुम्ही काळी मिरी वगळू शकता. भाजीला कोथिंबिरीने सजवा आणि नंतर सर्व्ह करा.