Which Pot Is Best For Summer :  मार्चपासूनच उकाडा वाढू लागलाय. दुपार सोडा, सकाळी ९ वाजल्यापासूनच उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागतात. एवढ्या उष्णतेत ग्लासभर थंड सरबत, पन्ह अगदी काही नाही तर थंडगार पाणीसुद्धा मन शांत करतं. पण, फ्रिजमधील थंड पाण्याने विविध त्रास जाणवू लागतात. अशावेळी माठातील थंड पाणी पिणे केव्हाही सोयीचे असते. तसेच याने कोणत्याही आजारांचा धोकादेखील नसतो. पण, हल्ली फॅशन म्हणून बाजारात अनेक प्रकारचे माठ पाहायला मिळतात; मग अगदी काळ्या, लाल माठांपासून ते पांढरे आणि विविध रंगाचे माठ उपलब्ध असतात. पण, रोजच्या वापरासाठी लाल की काळा, कोणता माठ विकत घ्यायचा याविषयी जाणून घेऊ….

लाल, काळा की पांढरा, कोणता माठ आहे बेस्ट?

लाल माठ हा शक्यतो विटांच्या लाल मातीने घडवला जातो, पांढरा माठ तर सिमेंट किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसने बनवला जातो तर काळा माठ हा थोड्या भुरकट काळ्या मातीने साकारला जातो. लाल व काळया माठात माती असल्याने पाणी नैसर्गिकरित्या उत्तम थंड राहू शकतं. काळा हा उष्णता शोषून घेणारा रंग असल्याने काळ्या माठातील पाण्याचा गारवा अन्य दोन माठांच्या तुलनेत थोडा जास्त असू शकतो.

लाल माठातील पाणी पिण्याचे फायदे

लाल माठातील पाणी शरीरातील पीएच पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते. हे मातीचे माठ पाणी लवकर थंड करते आणि बाजारात परवडणाऱ्या किमतीत सहज उपलब्ध असते. तुम्हाला ॲसिडिटी आणि गॅस्ट्रिकच्या त्रासांपासून आराम मिळू शकतो; पण मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो, लाल माठातील पाणी जास्त वेळ थंड राहू शकत नाही.

काळ्या माठातील पाणी पिण्याचे फायदे

आजकाल बऱ्याच लोकांना माठातील थंड पाणी प्यायला आवडते, पण लाल माठाबरोबर काळ्या माठातील पाणी पिण्याचेही खूप फायदे आहेत. काळ्या माठाला जीवाणू कमी चिकटतात, त्यातील पाणी जास्त वेळ थंड राहते आणि ते चयापचय क्रिया गतिमान करते व शरीरातील खनिजांची कमतरता दूर करते.

लाल माठ की काळा, कोणता सर्वोत्तम आहे?

तुमच्या गरजेनुसार लाल किंवा काळ्या रंगाचे माठ दोन्ही सर्वात योग्य आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार त्यांची निवड करू शकता.