scorecardresearch

Premium

Teeth & Gums: तुमच्या हिरड्यांचा रंग आरोग्याविषयी काय संकेत देतो? गुलाबी, लाल व ‘या’ रंगांचे अर्थ जाणून घ्या

Teeth & Gums Care: निरोगी गुलाबी ते भयानक लाल किंवा अगदी सूक्ष्म निळ्यापर्यंत विविध रंग हे तुमच्या आरोग्याविषयी नेमकं काय सांगतात हे आज आपण जाणून घेऊया.

Red Pink Blue Color Of Gums Indicate Health Blood And Oxygen Supply in Body Heart Conditions What Does Your Gum Tell Check
हिरड्यांच्या रंगावरून ओळखा आरोग्य (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Color Of Gums Indicate Health: तुमच्या हिरड्या हे तुमच्या सुंदर हसण्याचे रहस्य आहे हे तुम्हालाही माहित असेल पण तुमच्या हिरड्यांचा रंग हा तुमच्या आरोग्याशी सुद्धा थेट संबंधित असतो हे तुम्ही जाणता का? दातांना जोडून असलेल्या या मऊ नाजूक उती तुमच्या दातांचे संरक्षण करतात. तसेच या हिरड्यांचे रंग तुमच्या शरीरातील रक्ताच्या पेशींची संख्या, ऑक्सिजन, हृदयाचे आरोग्य याविषयी संकेत देत असतात. निरोगी गुलाबी ते भयानक लाल किंवा अगदी सूक्ष्म निळ्यापर्यंत विविध रंग हे तुमच्या आरोग्याविषयी नेमकं काय सांगतात हे आज आपण जाणून घेऊया. याविषयी कामिनेनी हॉस्पिटल, हैदराबादचे मॅक्सिलोफेशियल आणि डेंटल सर्जन, डॉ ब्रह्माजी राव, यांनी हेल्थशॉट्सला सांगितलेली माहिती पाहूया.

तुमच्या हिरड्याचा रंग तुमच्या आरोग्यबाबत काय सांगतो?

  1. गुलाबी हिरड्या

निरोगी हिरड्यांना एक विशिष्ट गुलाबी रंगाची छटा असते, जी तोंडाच्या चांगल्या आरोग्याचे प्रतीक आहे. गुलाबी हिरड्या पुरेसा रक्तपुरवठा, योग्य ऑक्सिजन असल्याचे दर्शवतात. घासताना किंवा फ्लॉसिंग करताना कडक आणि गुलाबी हिरड्यांमधून रक्त येऊ नये याची काळजी घ्यायला हवी. ही स्थिती टिकवून ठेवण्यासाठी नियमित दंत तपासणी आवश्यक आहे.

five foods to boost your energy health tips
कितीही काम असू दे, स्वतःच्या आरोग्याची हेळसांड नको; आहारात करा या पाच पदार्थांचा आवर्जून समावेश
Milk can raise your blood sugar levels or not Diabetic patients should know These things about milk
एक कप दूध पिण्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते का? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ…
Problem Solved Can Spicy Food Trigger Pimples Acne On Skin Experts Suggest How Spices Help To Get Clean Skin Diet Plan
तिखट पदार्थ खाल्ल्याने त्वचेवर पिंपल्स, पुरळ वाढतात की होते मदत? तज्ज्ञांनी सोडवला मोठा प्रश्न, लक्षात घ्या की..
Why moong dal is best for diabetic patient How to incorporate dals in your diet read what health expert said
Diabetic Patient : मधुमेहाच्या रुग्णांनी मूग डाळ का खावी? या डाळीचा आहारात कसा समावेश करावा? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात…
  1. फिकट किंवा पांढरे हिरड्या

फिकट गुलाबी किंवा पांढऱ्या हिरड्या अशक्तपणा किंवा इतर मूलभूत आरोग्य समस्यांचे संकेत असू शकतात. अशक्तपणा ही अशी स्थिती आहे जिथे शरीरात पुरेशा लाल रक्तपेशींचा अभाव असतो, ज्यामुळे ऑक्सिजनची पातळी कमी होते. तुम्हाला तुमच्या हिरड्यांमध्ये सतत फिकटपणा दिसल्यास, मूळ कारणाचे निदान करण्यासाठी आणि योग्य उपचार सुरू करण्यासाठी दंतचिकित्सक आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

  1. लाल किंवा सूजलेल्या हिरड्या

लाल, सुजलेल्या किंवा फुगलेल्या हिरड्या हिरड्यांच्या रोगाशी संबंधित असतात, हा रोगाचा प्रारंभिक टप्पा असू शकतो. खराब मौखिक स्वच्छता हे यामागील मुख्य कारण आहे. यामुळे बॅक्टेरिया जमा होतात आणि प्लेक तयार होतात, ज्यामुळे शेवटी जळजळ होते. उपचार न केल्यास, हिरड्यांना आलेली सूज अधिक गंभीर रोगात वाढू शकते, ज्यामुळे दात पडू शकतात.

  1. गडद लाल किंवा निळसर हिरड्या

गडद लाल किंवा अगदी निळसर रंगाच्या दिसणाऱ्या हिरड्या अपुरे ऑक्सिजन किंवा रक्ताभिसरण समस्या दर्शवू शकतात. हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या, श्वसन रोग किंवा इतर वैद्यकीय स्थितींशी संबंधित असू शकते. जर तुम्हाला तुमच्या हिरड्यांमध्ये अशी छटा दिसली, तर त्वरित वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.

  1. हिरड्यांवर तपकिरी किंवा काळे डाग

हिरड्यांवरील गडद डाग मेलेनिनमुळे येतात, जे आपल्या त्वचेच्या रंगासाठी जबाबदार एक रंगद्रव्य आहे. ही स्थिती सामान्यतः निरुपद्रवी आणि गडद त्वचा टोन असलेल्या व्यक्तींमध्ये सामान्य असते. तथापि, या डागांच्या स्वरूपामध्ये काही अनियमितता किंवा बदल दिसल्यास, तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

हे ही वाचा<< मिठाचा ‘हा’ उपाय डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास कसा करतो कमी? तज्ज्ञांनी सांगितली, सेवनाची योग्य पद्धत व प्रमाण

तुमच्या हिरड्यांच्या रंगाकडे लक्ष देणे हे अत्यंत गरेजचे आहे. जर तुम्हाला हिरड्यांचा कोणताही असामान्य रंग दिसला किंवा रक्तस्त्राव, सूज किंवा वेदना यासारखी लक्षणे सतत जाणवत असतील, तर त्वरीत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Red pink blue color of gums indicate health blood and oxygen supply in body heart conditions what does your gum tell check svs

First published on: 04-12-2023 at 15:54 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×