Xiaomi कंपनीच्या Redmi 8 स्मार्टफोन खरेदी करण्याची आज (दि.७) संधी असून यासाठी खास फ्लॅशसेलचं आयोजन करण्यात आलं आहे. फ्लिपकार्ट आणि Mi.com च्या संकेतस्थळावर दुपारी 12 वाजेपासून या फोनच्या सेलला सुरूवात होईल. सेलमध्ये या फोनच्या खरेदीवर काही खास ऑफर्सही आहेत. यात, एचडीएफसी बँकेच्या कार्डद्वारे खरेदी केल्यास 10 टक्के इंस्टंट डिस्काउंटची ऑफर, नो-कॉस्ट इएमआय, फ्लिपकार्ड अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड धारकांना पाच टक्के कॅशबॅकची ऑफर आहे. हा फोन म्हणजे Redmi 7 मालिकेची पुढील आवृत्ती आहे. वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले, ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप, फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट स्कॅनर यांसारखे फीचर्स यामध्ये आहेत.

रेडमी 8 डिस्प्ले फीचर्स आणि किंमत :
या स्मार्टफोनमध्ये 6.22 इंचाचा HD डिस्प्ले दिला आहे. हा स्मार्टफोन Splash-Proof कॉटिंगसह उपलब्ध करण्यात आला असून डिस्प्लेवर सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चा वापर करण्यात आला आहे. फोनमध्ये 3 जीबी रॅमसह 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज आहे. 3 जीबी रॅम व्हेरिअंटची किंमत 7 हजार 999 रुपये आणि 4 जीबी रॅम व्हेरिअंटची किंमत 8 हजार 999 रुपये आहे. पण हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी कंपनीकडून एका विशेष ऑफरची घोषणा करण्यात आली आहे. रेडमी 8 खरेदी करणाऱ्या पहिल्या 50 लाख ग्राहकांना 7 हजार 999 रुपयांमध्ये 4 जीबी रॅम व्हेरिअंट दिलं जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर आहे. यात तुम्ही ड्युअल सीमकार्डशिवाय मायक्रो एसडी कार्डचा वापर करु शकतात. सफायर ब्ल्यू , रुबी रेड आणि ऑनिक्स ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 12 मेगापिक्सल Sony IMX363 प्रायमरी सेंसर आहे. याशिवाय 2 मेगापिक्सल Portrait लेंस देखील आहे. फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. कॅमेऱ्यात गुगल लेंस फीचर आहे. 5000 mAh क्षमतेची दमदार बॅटरी यामध्ये असून 27 दिवसांचा स्टँडबाय टाइम मिळतो असा कंपनीचा दावा आहे. चार्जिंगसाठी यामध्ये युएसबी टाइप-सी पोर्ट आहे.