scorecardresearch

Redmi Note 4 चा सेल सुरू, जाणून घ्या कसा खरेदी करायचा फोन

फ्लिपकार्ट आणि मी डॉट कॉम या साइटवर हे फोन उपलब्ध आहेत.

redmi note 4
जर तुम्हाला Redmi Note ४ खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे.

जर तुम्हाला Redmi Note ४ खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. रेडमी कंपनीने आज (बुधवार) दुपारी १२ पासून या फोनचा फ्लॅश सेल सुरू केला आहे. कंपनीने रेडमी नोट ४ मध्ये २जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल मेमरी, रेडमी नोट ४ ३जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल मेमरी आणि रेडमी नोट ४ ४जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल मेमरीचे मॉडेल सादर केले आहेत. यामध्ये २जीबी रॅम मॉडेलची किमत ९,९९९ रूपये, ३जीबी रॅम मॉडेलची किमत १०,९९९ रूपये तर ४जीबी रॅम असलेल्या मॉडेलची किमत ही १२,९९९ रूपये इतकी आहे.

त्वरीत आणि सुलभरित्या कसा खरेदी करायचा फोन
आज दुपारी १२ वाजता सेल सुरू झाल्यानंतर तो खरेदी करण्यासाठी http://www.mi.com/in किंवा http://www.flipkart.com या वेबसाइटवर जा. वेबसाइटवर सेल सुरू होण्यापूर्वीच तुम्ही लॉगिन करा. आपला पत्ता, पिन कोड सारखी माहिती आधीच भरून ठेवा. सेल सुरू झाल्यानंतर लगेच रेडमी नोट ४ ला अॅड टू कार्ट करा. त्यानंतर इतर आवश्यक माहिती भरल्यानंतर फोनची ऑर्डर देता येऊ शकते. जर तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय निवडला तर आपल्याला फोन लवकर मिळण्याची शक्यता असते. कारण अनेकवेळा पेमेंट करताना फोन आऊट ऑफ स्टॉक होतो. अनेकवेळा व्यवहार रद्दही होतो.

काय आहेत फिचर्स
रेडमी नोट ४ मध्ये फुल मेटल युनिबॉडी डिझाइन आणि दमदार ४१०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. रेडमी नोट ३चे सर्वात खास वैशिष्ट्य त्याची बॅटरीच होती. रेडमी नोट ४ स्मार्टफोनमध्ये २.५डी आर्क ग्लास डिझायनबरोबर यामध्ये ५.५ इंचीचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिझोल्यूशन १९२०x१०८० पिक्सल आहे. रिअर कॅमेरा हा १३ मेगापिक्सल तर फ्रंट कॅमेरा हा ५ मेगापिक्सल आहे. त्याचबरोबर फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधाही यात आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2017 at 12:27 IST
ताज्या बातम्या