scorecardresearch

Premium

Marriage Tips: लग्नानंतर मुली ‘या’ अडचणींमुळे चिंतेत असतात; जाणून घ्या सविस्तर…

लग्नाचा सर्वात जास्त परिणाम मुलींवर होतो. कारण त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. ज्यामध्ये घर बदलण्यापासून ते कुटुंब, नातेसंबंध, जबाबदाऱ्या या सर्व गोष्टींचा समावेश असतो. अशा वेळी योग्य माहिती नसल्यामुळे मुलींकडून चुका होतात.

wedding-tips

WeddingTips For Groom And Bride : लग्नाचा सर्वात जास्त परिणाम मुलींवर होतो. कारण त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. ज्यामध्ये घर बदलण्यापासून ते कुटुंब, नातेसंबंध, जबाबदाऱ्या या सर्व गोष्टींचा समावेश असतो. अशा परिस्थितीत लग्नासाठी मुलींवर खूप दबाव असतो. तसं, लग्नापूर्वी मुलीला अनेक नियम सांगितले जातात. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या कोणत्याही नवविवाहित जोडप्याचं मन अस्वस्थ करू शकतात. त्यातील एक म्हणजे सासरच्या घरातील सदस्यांना कसं संबोधावं. तसं, नवऱ्याच्या नातेसंबंधानुसार, नवीन वधूला वागावं लागतं. पण नवरीकडून अपेक्षा असते की तिने अगदी लहान्यांना सुद्धा खूप घाबरून वागावं. अशा वेळी योग्य माहिती नसल्यामुळे मुलींकडून चुका होतात.

सुरुवातीला तुम्हाला या सर्व गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. तुमच्या आवडीच्या नसलेल्या काही गोष्टीही तुम्हाला कराव्या लागतील. सून म्हणून तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या असू शकतात.

disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
manoj jarnage patil
“बाकीचं नंतर बघू, आधी माझ्या किडन्या तपासा”, मनोज जरांगेंच्या किडनीचा नेमका घोळ काय?
Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
tanushree dutta on rakhi sawant
“तिने पाच लग्नं केलीत, पण…” तनुश्री दत्ताची राखी सावंतवर टीका; म्हणाली, “तिला पुरुष…”

लग्नाच्या रिती रिवाज पूर्ण करताना नवरा नवरीची खूप दमछाक होते. अशा स्थितीत लग्नाच्या दुसर्‍या दिवशी दुपारी गाढ झोपून घ्यावं, अशीही त्यांची मानसिकता असते. पण नवोदितांमध्ये तिला घरातील नवीन सदस्य म्हणून झोपावं की नाही, अशी भीती वाटत असते.

आणखी वाचा : Wedding Tips : लग्नाआधी तुमच्या जोडीदाराबद्दल या पाच गोष्टी आवर्जून जाणून घ्या, आयुष्य सुखी होईल

सामान्यतः दररोज कोणीही नववधूचे इतके जड दागिने आणि भरजरी कपडे घालत नाही. पण दागिने आणि जड वस्त्रे घालून नववधू म्हणून किती दिवस जगावं लागेल, असा प्रश्न वधूच्या मनात कायम असतं. अशा स्थितीत तिला या सगळ्यातून कधी मुक्ती मिळेल, असा विचार तिच्या मनात येत असतो.

म्हाला तुमच्या पतीसोबत राहण्यासाठी, त्याचे वागणे आणि मार्ग समजून घेण्यासाठी वेळ लागतो. तुमच्या दोघांचे व्यक्तिमत्त्व आणि आवडीनिवडी जुळत नसतील, पण तुम्हाला त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागेल.

आणखी वाचा : Marriage Tips: साखरपुडा झाल्यानंतर चुकूनही या चुका करू नका, नातं तुटू शकतं

लग्नाआधी काम करत असाल तर तितकीशी जुळवाजुळव करायची गरज नाही. तुमची आई घरात कुटुंबाची काळजी घेते. पण लग्नानंतर तुम्हाला तुमच्या कामासोबतच तुमच्या वैयक्तिक आयुष्याचा समतोल साधावा लागेल. नोकरीबरोबर कुटुंबाची काळजी घेणे, घरातील कामे करणे, सासू-सासऱ्यांची काळजी घेणे इत्यादी कामे करावी लागतील. यासाठी तुम्ही या सर्व गोष्टी कशा करायच्या हे आधीच ठरवायला हवे.
लग्नानंतर मुलगी जेव्हा नवीन कुटुंबात जाते तेव्हा ती फक्त त्या विधीची वाट पाहत असते ज्यात तिला तिच्या पालकांना परत भेटायला वेळ मिळेल. कारण नवीन ठिकाणी तिला आई-वडिलांची कमतरता सर्वात जास्त जाणवते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-12-2021 at 21:36 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×