आजच्या काळात रिलेशनशीप कधी निर्माण होतात आणि कधी तुटतात हे कळतच नाही. सध्या नवा रिलेशनशिपचा प्रकार खूप ट्रेंड होत आहे ज्याला बेंचिंग रिलेशनशिप म्हटले जाते. तरुण पिढीमध्ये बेंचिंग रिलेशनशिप सध्या फार ट्रेंड होत आहे. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, बेंचिंग रेलिशनशिप म्हणजे काय? येथे बेंच म्हणजेच खुर्ची असा अर्थ होतो. पण बेंच आणि रिलेशनशिपचा काय संबध? चला तर मग जाणून घेऊ या….
सध्या ट्रेंड होत असलेल्या बेंचिंग रिलेशनशिपचा अर्थ असा आहे की, एक जोडीदार दुसऱ्या पार्टनरबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे, परंतु त्या नात्याबाबत गांभीर्याने विचार करत नाही. अनेकदा एखाद्या व्यक्तीला दुसरी व्यक्ती आवडत असते, परंतु वेळ घालवण्यासाठी असे लोक रिलेशनशिपमध्ये येतात. पण समोरच्या व्यक्तीवर त्याचं खरं प्रेम नसते.
हेही वाचा – पावसाळ्यात सर्दी-खोकल्यामुळे वैतागला आहात? सितोपलादी ठरतेय प्रभावी, जाणून घ्या या आयुर्वेदिक औषधाचे फायदे
भावनिक आधाराची गरज
जेव्हा एखाद्या व्यक्तीला एकटेपणा जाणवतो किंवा त्याला भावनिक आधाराची आवश्यकता असते तेव्हा असे घडते, तेव्हा तो ज्याच्याबरोबर वेळ घालवू शकेल अशा व्यक्तीचा शोध घेतो. या नात्यात जोडपे एकमेकांच्या गरजा पूर्ण करतात, पण कोणत्याही प्रकारची बांधिलकी नसते. अशा नात्यात दोन्ही हे पटत असेल तरच ते एकत्र राहतात, पटत नसेल तर ते दुसऱ्याबरोबर रिलेशनशिपमध्ये राहू शकतात.
सोशल मीडिया
सोशल मीडिया आणि काही डेटिंग ॲप्समुळे जोडीदार शोधणे आता सोपे झाले आहे. त्याच्या मदतीने, आता एकाच वेळी अनेक लोकांना डेट करता येते, ज्यामुळे बेंचिंगचा धोका वाढतो. असे काही लोक आहेत जे गंभीर रिलेशनशिपमध्ये येण्यास घाबरतात कारण त्यांना आपले मन दुखवाण्याची भीती वाटत असते. अशा परिस्थितीत हे लोक बेंचिंग रिलेशनशिपचा आधार घेतात.
हेही वाचा – दह्यात दालचिनी पावडर टाकून त्याचे सेवन करावे का? जाणून घ्या त्याचे अनेक फायदे आणि काही तोटे
बेंचिंग रिलेशनशिपपासून धोका
जर तुमचे कोणाबरोबर तरी बेंचिंग रिलेशनशीप असेल आणि तुम्ही त्याच्याशी भावनिकरित्या खूप जोडलेले असाल तर तुमच्या भावना दुखावू शकतात. कारण काही काळानंतर तो तुम्हाला सोडून दुसऱ्या व्यक्तीबरोबर बोलू लागले तर यामुळे तुमच्या भावना दुखावू शकतात. याशिवाय बेंचिंग रिलेशनशिपमुळे तुमचा वेळही वाया जातो, कारण जोपर्यंत त्याला तुमची गरज असते तोपर्यंत तो तुमच्याबरोबर राहतो, पण जेव्हा त्याची गरज संपते तेव्हा तो तुम्हाला सोडून जातो.
बेंचिंग रिलेशनशिप दरम्यान, जर समोरची व्यक्ती तुमचा आदर करत नसेल आणि तुमच्या गरजा पूर्ण करण्यास तयार नसेल, तर तुम्ही या नात्यातून बाहेर पडू शकता. परंतु तुम्ही तुमचे रिलेशनशिप गांभीर्याने घेण्याचा विचार करण्याबाबत जोडीदाराबरोबर बोलला असाल तर तुम्ही त्या व्यक्तीबरोबर राहू शकता. पण जर तुमचा जोडीदार रिलेशनशीप गांभीर्याने घेण्याचा विचार करत नसेल तर अशा नात्यापासून दूर राहणे तुमच्यासाठी चांगले आहे.