जोड्या स्वर्गात बनतात असे म्हणतात, पण लग्नाआधी किंवा लग्नानंतर जोडप्यांमध्ये भांडण होत असल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. ही भांडणे हा सहसा एकमेकांचे विचार न पटल्यामुळे होतात. नात्यात भांडणे होणे स्वाभाविक आहे. पण काही नात्यांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त भांडणे होतात, त्यामुळे त्यांच्यात एकमेकांविषयी तेढ निर्माण होतो.

मोठे भांडण झाल्यावर जोडप्यांनी काय करावे?

दोन माणसं एकत्र राहतात तेव्हा छोटी छोटी भांडणं होणं साहजिकच असतं. रुसलेल्याची समजूत घातल्यावर सगळं चांगलं होतं, पण पुन्हा पुन्हा भांडण होत असेल तर तुम्हाला समजूतदारपणा दाखवायची वेळ आली आहे. सततच्या भांडणांमुळे जोडप्यांना त्यांचा चांगला वेळ घालवता येत नाही. त्याच वेळी, त्यांच्यातील अस्वस्थता वाढते. अशा परिस्थितीत चांगल्या नात्यासाठी काय आवश्यक आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.

Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?
Hindus and Sikhs in the neighbouring countries will not benefit from CAA
‘सीएए’मुळे शेजारी देशांतील हिंदू, शिखांचेही भले होणार नाहीच…
food products marathi news, price continuously increasing marathi news
खाद्यवस्तूंच्या चढ्या किंमती रिझर्व्ह बँकेचीही डोकेदुखी

Long Distance Relationship मध्ये ‘या’ चुका विसरुनही करू नका; होऊ शकते मोठे नुकसान

नाते तुटण्याची तीन महत्वाची कारणे

  • परस्पर समंजसपणाचा अभाव

जोडप्यांमध्ये परस्पर समंजसपणा असणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळेच नाती टिकतात. तसे न झाल्याने भांडणे होतात. एकमेकांचे विचार न पटल्यामुळेही ही समस्याही येते. अशा वेळी तुम्ही अनेकदा भांडण करून तुमचे मुद्दे समजावून सांगण्याचा प्रयत्न करता, त्यामुळे प्रकरण आणखी बिघडते. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रेमाने आपला मुद्दा पटवण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला खूप फायदा होईल.

  • जुन्या गोष्टी उकरून काढणे

जर तुम्ही जाणे गोष्टी किंवा आपल्या जोडीदाराशी संबंधित भूतकाळातील गोष्टी सातत्याने उकरत राहिलात, तर यामुळे त्यांना राग येऊ शकतो, तसेच त्यांची चिडचिड होते. अनेक वेळा आपण मस्करीमध्ये आपली मर्यादा ओलांडतो, अशा परिस्थितीत आपण आपल्या जोडीदाराला कुठेतरी दुखावतो. म्हणूनच, त्याच्या भूतकाळाबद्दल जास्त न बोलल्यास चांगले होईल.

  • वेळ न देणे

बर्‍याच वेळा आपण ऑफिसच्या कामामध्ये असे अडकतो की आपण आपल्या जोडीदाराला वेळ देऊ शकत नाही, ज्यामुळे भांडण होते. म्हणून आपल्या पार्टनरला वेळ देण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्याशी बोला. असे केल्याने नात्यातील कडवटपणा दूर होतो. वेळ मिळेल तेव्हा त्यांच्यासोबत कुठेतरी फिरायला जा.