जिओ पुन्हा एकदा ग्राहकांना दणका देण्याच्या तयारीत ?

जिओनं ट्रायकडे सादर केलेल्या कन्सल्टेशन पेपरमध्ये काही मागण्या केल्या आहेत.

रिलायन्स जिओ पुन्हा एकदा ग्राहकांना दणका देण्याची शक्यता आहे. कंपनीनं प्रति जीबी डेटाच्या फ्लोअर प्राईजमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे. ती किंमत वाढून १५ रूपये करण्यात यावी, असं जिओचं म्हणणं आहे. याव्यतिरिक्त आगामी ६ ते ९ महिन्यांमध्ये फ्लोअर प्राईज २० रूपये प्रति जीबी करण्यात यावे, असं कंपनीनं ट्रायला म्हटलं आहे. वायरलेस डेटाचे दर आता ग्राहकांच्या डेटा वापरण्यावर अवलंबून असतील असं जिओनं सांगितल्याची माहिती इटी टेलिकॉमकडून देण्यात आली. बाजारात निर्माण होणारी अस्थिरता आणि त्याचा परिणाम पाहता सध्या यात कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचंही जिओनं म्हटलं आहे.

जिओनं ट्रायकडे सादर केलेल्या कन्सल्टेशन पेपरमध्ये टेलिकॉम सेवा पुरवताना टॅरिफशी निगडीत समस्यांचा उल्लेख केला आहे. भारतीय युझर दरांबाबत अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळे फ्लोअर प्राईस एकदा वाढवण्याऐवजी दोन-तीन वेळा ती वाढवण्यात यावी. यामुळे टॅरिफ महाग होण्याची समस्या सोडवता येऊ शकेल, असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त नवे फ्लोअर प्राईज सर्व विद्यमान टॅरिफ आणि सेगमेंट्ससाठी एकसारखे असावे आणि त्यात वैयक्तिक ग्राहकासह कॉर्पोरेट्सनाही सहभागी करण्यात यावं, असंही जिओनं नमूद केलं आहे.

सध्या एजीआरसाठी द्यावे लागणाऱ्या रकमेमुळे टेलिकॉम इंटस्ट्रीवर मोठ्या प्रमाणात ताण आला आहे. एजीआरसाठी व्होडाफोनला ५३ हजार कोटी रूपये आणि एअरटेलला ३५ हजार कोटी रूपयांचा भरणा करावा लागणार आहे. फ्लोअर प्राईज निश्चित झाल्यानंतर या क्षेत्रालाही त्याचा फायदा मिळू शकतो, असं जिओचं म्हणणं आहे.जिओनं ट्रायकडे सादर केलेल्या कन्सल्टेशन पेपरमध्ये

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Reliance jio asked trai to define data per gb floor price tariff may hike jud

ताज्या बातम्या