Reliance Jio ने सगळ्यात स्वस्त असलेले ‘हे’ दोन रिचार्ज प्लॅन केले बंद

हे लक्षात घेण्यासारखे आहे की हे दोन्ही रिचार्ज प्लॅन या वर्षी मे मध्ये लॉंच करण्यात आले होते.

Reliance Jio
हे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन होते (प्रातिनिधिक फोटो)

देशातील आघाडीची नेटवर्क प्रदाता कंपनी म्रिहणून लायन्स जिओ ओळखली जाते. आता ही कंपनी आपल्या जिओ फोनसाठी दोन सर्वात स्वस्त योजना बंद करत आहे. म्हणजेच आता जिओ फोन वापरकर्ते ३९ आणि ६९ रुपयांचे प्लॅन वापरू शकणार नाहीत. त्याचबरोबर हे प्लॅन जिओच्या अधिकृत वेबसाइट आणि मायजियो अॅपवरूनही काढून टाकण्यात आले आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की या दोन्ही योजना या वर्षी मे मध्ये सादर करण्यात आल्या. त्यानुसार, आता हे दोन प्लॅन बंद झाल्यानंतर जिओचा ७५ रुपयांचा प्लॅन हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे.

जे वापरकर्ते ६९ रुपयांचा प्लॅन वापरत होते त्यांना आता जिओच्या अधिकृत वेबसाइटवर जिओ फोनसाठी उपलब्ध ७५ रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन खरेदी करावा लागेल. याशिवाय १२५, १५५,१८५ आणि ७४९ रुपयांचे प्रीपेड प्लॅन रिलायन्स जिओच्या अधिकृत वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत.

जिओचा ३९ रुपयांचाअसा होता प्लॅन

या प्रीपेड प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना दररोज १०० MB हाय स्पीड डेटा मिळत असे. एकूणच, या प्लॅनमध्ये १४०० MB हाय स्पीड डेटा उपलब्ध होता. हाय स्पीड डेटा लिमिट संपल्यानंतर ६४ केबीपीएसचा स्पीड इंटरनेटवर उपलब्ध होता. या प्लानमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग उपलब्ध होते. या प्लॅनची ​​वैधता १४ दिवसांची होती. इतर फायद्यांविषयी बोलताना, JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud यासह Jio अॅप्स या योजनेसह उपलब्ध होते.

जिओचा ६९ रुपयांचा असा होता प्लॅन

या प्रीपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज ०.५ GB हाय स्पीड डेटा मिळत असे. एकूणच, या प्लॅनमध्ये ६GB हाय स्पीड डेटा उपलब्ध होता. हाय स्पीड डेटा लिमिट संपल्यानंतर ६४ केबीपीएसचा स्पीड इंटरनेटवर उपलब्ध होता. या प्लानमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग उपलब्ध होते. या प्लॅनची ​​वैधता १४ दिवसांची होती. इतर फायद्यांविषयी बोलताना, JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud यासह Jio अॅप्स या योजनेसह उपलब्ध होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Reliance jio has discontinues this two cheapest recharge plans ttg