Jio युझर्सना आता ‘डेली डेटा लिमिट’ची चिंता नाही! ‘हे’ आहेत ५ जबरदस्त प्लॅन्स

Jio चे हे ‘नो डेली डेटा लिमिट’ प्रीपेड प्लॅन्स १२७ रुपयांपासून सुरू होतील आणि २, ३९७ रुपयांपर्यंत उपलब्ध असतील.

Reliance Jio new 5 No Daily Data Limit prepaid plans gst 97
Jio यानिमित्ताने पुन्हा एकदा Airtel आणि Vi ला थेट आव्हान देत असल्याचं म्हटलं जात आहे. (Photo : File)

Reliance Jio ने या आठवड्याच्या सुरुवातीलाच आपले नवीन प्रीपेड प्लॅन्स लॉन्च केले आहेत. विशेष म्हणजे कंपनीकडून लॉन्च करण्यात आलेलं हे प्लॅन्समध्ये कोणत्याही प्रकारची डेली डेटा लिमिट असणार नाही. दरम्यान, जिओचे हे प्लॅन्स १२७ रुपयांपासून सुरू होतील आणि २, ३९७ रुपयांपर्यंत उपलब्ध असतील. त्यामुळे, जिओच्या युझर्स कोणत्याही डेली डेटा लिमिटची चिंता असणार नाही. ते अगदी आरामात पूर्ण डेटा वापरू शकतात. यामार्फत जिओ पुन्हा एकदा एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाला थेट आव्हान देत असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, आम्ही आज तुम्हाला जिओच्या याच ५ ‘नो डेली डेटा लिमिट प्लॅन्स’बद्दल माहिती देणार आहोत.

  • १२७ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

जिओचा नो डेली डेटा लिमिट प्लॅन १२७ रुपयांपासून सुरू होतो. हा पॅक कोणत्याही मर्यादेशिवाय १२ जीबी हाय-स्पीड ४ जी डेटासह येतो. या प्लॅनमध्ये डेटा व्यतिरिक्त अमर्यादित कॉल्स, १०० एसएमएस देखील दिले जातात. यासह, जिओ अ‍ॅप्सची सब्सक्रिप्शन देखील विनामूल्य उपलब्ध आहे. या प्लॅनची वैधता १५ दिवसांची आहे.

  • २४७ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

जिओच्या १२७ रुपयांच्या प्लॅन व्यतिरिक्त तुम्हाला २४७ रुपयांचा ‘नो डेली डेटा लिमिट’ प्रीपेड प्लॅन देखील मिळतो. या प्लॅनची वैधता ३० दिवसांची आहे. यामध्ये २५जीबी हाय-स्पीड ४जी डेटा देण्यात आला आहे. डेटाशिवाय अमर्यादित कॉल, १०० एसएमएस देखील या प्लॅनमध्ये दिले आहेत. या योजनेसह जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाउडसारख्या जिओ अ‍ॅप्सचं सब्सक्रिप्शनही मोफत उपलब्ध आहे.

  • ४४७ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

जिओच्या ४४७ रुपयांच्या ‘नो डेली डेटा लिमिट’ प्रीपेड प्लॅनची वैधता ६० दिवसांची आहे. यामध्ये युजर्सना ५० जीबी हाय स्पीड ४जी दिलं जातं. यासह, युझर्स त्यांच्या गरजेनुसार डेटा वापरू शकतात आणि दुसऱ्या दिवसासाठी देखील ठेवून शकतात. या प्लॅनचे उर्वरित फायदे वरील प्लॅन्सप्रमाणेच आहेत.

  • ५९७ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

जिओच्या ५९७ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची वैधता ९० दिवसांची आहे. यामध्ये ७५ जीबी हाय-स्पीड डेटा कोणत्याही डेली डेटा लिमिटशिवाय दिला जातो. उर्वरित फायदे वर नमूद केलेल्या योजनेप्रमाणेच आहेत.

  • २,३९७ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

जिओचा २,३९७ रुपयांचा प्रीपेड प्लॅन हा यातला शेवटचा प्लॅन आहे. यामध्ये देखील डेली डेटा लिमिट नाही. या प्लॅनची वैधता ३६५ दिवस आहे. हा प्लॅन३६५जीबी हायस्पीड डेटासह येतो. याशिवाय अमर्यादित कॉल आणि १०० एसएमएस देखील यात दिले आहेत. या योजनेसह जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाउडसारखे जिओ अ‍ॅप्सचं सब्सक्रिप्शनही मोफत उपलब्ध आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Reliance jio new 5 no daily data limit prepaid plans gst

ताज्या बातम्या