scorecardresearch

Allergy : धुळीच्या एलर्जीने बेजार झालात? ‘या’ घरगुती उपचारांनी मिळू शकतो आराम

जीवनशैली आणि आहारामध्ये काही बदल करून या एलर्जीपासून आराम मिळू शकतो. तसेच, काही घरगुती उपचार देखील ही समस्या घालवण्यात फायदेशीर ठरू शकते.

Allergy : धुळीच्या एलर्जीने बेजार झालात? ‘या’ घरगुती उपचारांनी मिळू शकतो आराम
प्रतिकात्मक छायाचित्र (pic credit – pixabay)

धुळीच्या एलर्जीचा अनेकांना त्रास आहे. ही एलर्जी अनेक समस्यांना आमंत्रण देऊ शकते. धुळीच्या एलर्जीने श्वास घेण्यात त्रास होतो. एलर्जीने रोगप्रतिकार शक्ती देखील घटण्याची शक्यता असते. धुळीच्या एलर्जीने सर्दी, ताप, खोकला हे आजार होऊ शकतात. त्यामुळे वेळीच यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. जीवनशैली आणि आहारामध्ये काही बदल करून या एलर्जीपासून आराम मिळू शकतो. तसेच, काही घरगुती उपचार देखील ही समस्या घालवण्यात फायदेशीर ठरू शकतात.

१) हळद

हळद आरोग्यासाठी उपयुक्त मानली जाते. हळदीमध्ये औषधी गुणधर्म असतात जे अनेक आजारांना कमी करण्यात फायदेशीर ठरतात. हळदीमधील कुरक्युमिनमध्ये दाहकता विरोधी गुणधर्म आहे. त्वचेला उजळ देण्यासाठी देखील हळदीचा वापर होतो. दुधात हळद मिसळून पिल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. तसेच हळद ही शरीराला आतून मजबूत बनवते. या पार्श्वभूमीवर हळदीचा आहारात समावेश करावा.

(राजू श्रीवास्तव यांची झाली व्हर्च्युअल ऑटोप्सी, काय असते ते? जाणून घ्या..)

२) ग्रीन टी

चांगले पचन आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात ग्रीन टी फायदेशीर आहे. ग्रीन टी धुळीच्या एलर्जीमुळे नाकातील जळजळ कमी करण्यास मदत करते. ग्रीन टीमुळे त्वचाही चांगली राहाते आणि वजनही कमी होते.

३) मध

मधाचे अनेक फायदे आहेत. मधाने धुळीच्या एलर्जीची लक्षणे कमी होऊ शकतात. मध घेताना ते शुद्ध असावे याची काळजी घ्यावी. शुद्ध मधामध्ये अनेक पोषक तत्व असता. तसेच शुद्ध मध हे शरीराला नुकसान पोहोचवत नाही. मधापासून शरीराला कॉपर, लोह, फॉस्फोरस, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम सारखी तत्वे मिळतात. मध वजन कमी करण्यातही मदत करते. मध त्वचा निरोगी ठेवण्यातही मदत करते.

(Sperm count : शुक्राणूंची संख्या का कमी होते? जाणून घ्या, आहारात करा हा बदल)

४) दालचिनी

दालचिनी ही अन्नाची चवही वाढते आणि ते आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. दालचिनीने रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्याचबरोबर धुळीच्या एलर्जीच्या लक्षणांना कमी करण्यात दालचिनी फायदेशीर ठरू शकते.

५) सुका मेवा

काजू, बदाम आणि अक्रोड हे त्यांच्या पोषक तत्वांसाठी लोकप्रिय आहेत. सुका मेव्याचे सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकार शक्ती झपाट्याने वाढते. तसेच शरीरातील जळजळ कमी होते. एलर्जीची लक्षणे घालवण्यासाठी सुक्या मेव्याचे सेवन हे चांगले पर्याय आहे.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि उपचार सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Remedies to prevent dust allergy ssb

ताज्या बातम्या