आजच्या धावपळीच्या जीवनात माणसे चेहऱ्याची जितकी काळजी घेतात तितकी शरीराच्या इतर भागाचीही काळजी घेत नाहीत, तर त्यांना पूर्ण काळजीचीही गरज असते. प्रखर सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळे अनेक वेळा चेहऱ्यावर काळे डाग पडतात. या गडद डागांना पिगमेंटेशन म्हणतात. कडक उन्हात आणि हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी होते.

तज्ञांच्या मते, जास्त सूर्यप्रकाश मेलेनिनला प्रोत्साहन देतो. हे टाळण्यासाठी सूर्यप्रकाशाचा अतिरेक टाळावा. त्यामुळे त्वचेवर टॅनिंग, कोरडेपणा, सुरकुत्या, चकचकीत आणि गडद काळे डाग दिसू लागतात. तसेच मान, कोपर आणि गुडघ्यांवर काळे डाग पडतात.

Clean Intestine In 20 Minutes In Morning With These Simple Five Asanas How Much Luke Warm Water To Drink First After Waking Up
Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा
Why a sunscreen over SPF 50 is still the best bet for the beach
तुम्हीही उन्हात जाताना ‘SPF 50’ सनस्क्रीन वापरताय का? मग त्वचारोग तज्ज्ञ काय सांगतात वाचाच
how to water a plant tips in marathi
Garden tips : उन्हाळ्यामध्ये झाडांना पाणी देण्याची योग्य वेळ काय? रोपांच्या वाढीसाठी पाहा ‘१०’ टिप्स
Which oil is best for cooking
Oil For Cooking : स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरावे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात

विज्ञानानुसार आपल्या त्वचेमध्ये मेलेनिन नावाचे एक रंगद्रव्य असते जे आपल्या त्वचेला रंग देते, परंतु अनेकदा या मेलेनिनचे प्रमाण जास्त वाढल्याने रंगद्रव्य निर्माण होते. काळ्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत. बाजारातील अनेक प्रकारचे स्क्रब आणि क्रीम वापरूनही फरक पडत नसेल तर काही प्रभावी घरगुती उपाय करा.

दही

त्वचेवरील काळे डाग आणि डाग दूर करण्यासाठी दही खूप प्रभावी आहे. कारण दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड आणि व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात ब्लिचिंगचे गुणधर्म असतात. यामुळे तुम्ही थेट चेहऱ्यावर दही लावा आणि १० मिनिटांनंतर कोमट पाण्याने स्वच्छ करा.

काकडी

काळे डाग दूर करण्यासाठी सर्वात प्रथम काकडी कापून घ्या. आपल्या कोपर आणि गुडघ्यावर १५ मिनिटे घासून घ्या. पाच मिनिटे असेच राहू द्या. यानंतर कोपर आणि गुडघा थंड पाण्याने धुवा. यामुळे कोपराचा काळेपणा दूर होऊ शकतो.

बटाटा

बटाट्यामध्ये क्लीनिंग आणि ब्लिचिंग गुणधर्म असतात. यासाठी बटाटा कापून कोपर आणि गुडघ्यावर सुमारे ५ मिनिटे चोळा. असे दिवसातून दोनदा केल्याने कोपर आणि गुडघ्यांचा काळेपणा दूर होतो.

हळद

त्वचेवरील काळे डाग दूर करण्यासाठी दुधात थोडी हळद मिसळा. आता ही पेस्ट गुडघे आणि कोपरांवर लावा. काही वेळ मसाज केल्यानंतर त्वचा कोमट पाण्याने धुवा. आता तुम्हाला हवे असल्यास या मिश्रणात मधही घालता येईल. याने काळेपणा कमी होण्यास मदत होईल.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)