काही लोकांच्या शरीरावर अनेक तीळ आणि चामखीळ असतात. त्यातच जर हे तीळ आणि चामखीळ एखाद्याच्या चेहऱ्यावर असतील तर त्यामुळे त्यांचे सौंदर्य बिघडू शकते. यामुळे ते कमी आकर्षक वाटू शकतात. तीळ आणि चामखीळ असणे सामान्य गोष्ट आहे. परंतु जर तुम्हाला हे नको असतील, तर तुम्ही घरच्या घरी ते काढून टाकू शकता. चेहऱ्यावरून तीळ किंवा चामखीळ काढण्यासाठी कोणतेही ऑपरेशन किंवा लेजर ट्रीटमेंट करण्याची गरज नाही. उलट कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडेल तेलाचा वापर करून तुम्ही हे काढू शकता.

तीळ आणि चामखीळ काढण्यासाठी एरंडेल तेलाचा वापर कसा करावा?

बेकिंग सोडा आणि एरंडेल तेल :

अर्धा चमचा बेकिंग सोडा घ्या त्यात दोन ते तीन थेंब एरंडेल तेल मिसळून त्याची पेस्ट तयार करा. रात्री झोपताना ही पेस्ट तीळ आणि चामखीळांवर लावून बँडेजने झाकून घ्या. सकाळी उठल्यावर बँडेज काढून चेहरा धुवून घ्या. तुम्ही एक दिवस आड ही कृती करू शकता.

mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Perfect 7 Times To Drink Water In 24 Hours
दिवसभरात पाणी पिण्यासाठी ‘या’ ७ वेळा आहेत परफेक्ट! २४ तासांत कधी पाणी प्यावं? वाचा फायदे

सतत लघवी होणे ठरू शकते ‘या’ आजाराचे कारण; लगेचच आहारात करा बदल

मध आणि एरंडेल तेल :

एक चमचा मधामध्ये दोन ते तीन थेंब एरंडेल तेल मिसळून ही पेस्ट तीळ किंवा चामखीळांवर लावा. यानंतर त्यावर बँडेज लावून झाकून ठेवा आणि काही तासांनी बँडेज काढून चेहरा धुवून घ्या. दिवसातून दोन वेळा ही कृती करा. सात ते आठ दिवसांमध्ये तुम्हाला चांगले परिणाम दिसू शकतात.

आले आणि एरंडेल तेल :

अर्धा चमचा सुंठ पावडर घेऊन त्यात दोन ते तीन थेंब एरंडेल तेल मिसळून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट काही तास तीळ आणि चामखीळावर लावून ठेवल्यावर धुवावी. दिवसातून दोन वेळा ही कृती करा.

अंडरआर्म पिगमेंटेशनच्या समस्येने हैराण आहात? ‘या’ टिप्सचा वापर करून व्हा निश्चिंत

टी ट्री ऑइल आणि एरंडेल तेल :

एक चमचा एरंडेल तेल घेऊन त्यात दोन ते तीन थेंब टी ट्री ऑइल मिसळावे. हे मिश्रण कापसाच्या मदतीने तीळ आणि चामखीळावर लावावे. ३ ते ४ तासांनी चेहरा धुवावा. दिवसातून दोनदा वापरल्याने तुम्हाला चांगले परिणाम मिळतील.

(येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया हे उपाय वापरण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.)