Renault Triber झाली महाग, कंपनीने वाढवली किंमत

Renault ची लोकप्रिय सब-कॉम्पॅक्ट एमपीव्ही Renault Triber च्या किंमतीत वाढ…

Renault ची लोकप्रिय सब-कॉम्पॅक्ट एमपीव्ही Renault Triber महाग झाली आहे. जानेवारी महिन्यात कंपनीने ही कार BS6 इंजिनसह लाँच केली होती. तेव्हा व्हेरिअंटनुसार या कारच्या किंमतीत 4 हजार ते 29 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कंपनीने Triber च्या किंमतीत वाढ केली आहे.

यावेळी कंपनीने Renault Triber च्या बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ केलेली नाही. म्हणजे, ही 7-सीटर कार अद्यापही 4.99 लाख रुपये या बेसिक किंमतीत उपलब्ध आहे. तर, RXS, RXT आणि RXZ व्हेरिअंट्सची किंमत आता अनुक्रमे 5.78 लाख, 6.28 लाख आणि 6.82 लाख रुपये इतकी झाली आहे. या तिन्ही व्हेरिअंट्सच्या किंमतीत चार हजार रुपयांची वाढ झाली आहे. या सर्व एक्स-शोरुम किंमती आहेत.

Renault Triber मध्ये 1.0-लिटर, 3-सिलिंडर पेट्रोल इंजिन आहे. 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स असलेले हे इंजिन 6250 rpm वर 72 PS ऊर्जा आणि 3500 rpm वर 96 Nm पीक टॉर्क निर्माण करते. गाडीत ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, ईबीडीसह एबीएस, रिअर पार्किंग सेंसर्स, स्पीड अलर्ट आणि पेडेस्ट्रियन प्रोटेक्शन यांसारखे सुरक्षिततेचे फीचर्स स्टँडर्ड म्हणजे सर्व व्हेरिअंटमध्ये आहेत. टॉप व्हेरिअंटमध्ये अजून दोन एअरबॅग्स म्हणजे एकूण चार एअरबॅग आहेत.

रेनो ट्रायबर हे आकर्षक डिझाइन असलेले दणकट, संक्षिप्त, ऐसपैस जागा असलेले, मॉडय़ुलर वाहन आहे, ज्यामध्ये चार मीटरहून कमी जागेत सात व्यक्ती सहज बसू शकतात. ट्रायबर हे आधुनिक, प्रशस्त तरीही संक्षिप्त, अल्ट्रा-मॉडय़ुलर, इंधनाची बचत करणारे वाहन आहे, ज्यामध्ये आकर्षक इंटेरिअरसह अनेक आधुनिक आणि वैशिष्टय़े आहेत. रेनो ट्रायबर हा भारत आणि फ्रान्समधील रेनो टीमचा संयुक्त प्रकल्प आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Renault triber mpv price increased in india second price hike since bs6 update sas

Next Story
राज्याला वीज टंचाई भासणार नाही- पवार
ताज्या बातम्या