Republic Day 2026 Wishes mMessages, Quotes, And Greetings २६ जानेवारी हा दिवस भारतीय लोकशाहीचा आत्मा दर्शवणारा महत्त्वाचा दिवस आहे. २६ जानेवारी १९५० रोजी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारले आणि सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष व लोकशाही प्रजासत्ताक म्हणून जगासमोर उभा राहिला. प्रजासत्ताक दिन म्हणजे केवळ सुट्टीचा दिवस नसून, हक्कासह कर्तव्याची आठवण करून देणारा राष्ट्रीय उत्सव आहे.

या दिवशी देशभरात शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी तिरंगा डौलाने फडकतो. राजधानी नवी दिल्ली येथे होणारे भव्य पथसंचलन भारताच्या सैन्यशक्ती, सांस्कृतिक विविधता आणि राष्ट्रीय एकतेचे दर्शन घडवते.

सोशल मीडियावर शुभेच्छांचा ओघ

आजच्या डिजिटल युगात प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा WhatsApp, Facebook, Instagram Status, Stories आणि Messagesद्वारे व्यक्त केल्या जातात. शब्दांमधून देशप्रेम व्यक्त करण्याची ही एक सुंदर संधी असते. तुमच्या प्रियजनांना, मित्र-परिवाराला या शुभेच्छा पाठवा.

प्रजासत्ताक दिन २०२६ साठी मराठी शुभेच्छा संदेश

१) संविधानाने दिले हक्क अमूल्य,
कर्तव्यांची जपणूक हेच खरे राष्ट्रप्रेम।
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

२) तिरंग्यात सामावलेले स्वप्न आहे आपले,
एकता, समता, बंधुता हेच बळ देशाचे।
प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

३) लोकशाहीचा अभिमान बाळगूया,
संविधानाचा सन्मान राखूया।
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

४) विविधतेत एकता जपणारा भारत,
हेच आमचे सामर्थ्य, हीच आमची ओळख।
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

५) देशासाठी विचार, देशासाठी आचार,
हीच खरी प्रजासत्ताक दिनाची शपथ।
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Republic Day 2025 Wishes
: प्रजासत्ताक दिन २०२६ साजरा करण्यासाठी शुभेच्छा संदेश, प्रेरणादायक कोट्स आणि Greetings (फोटो सौजन्य : लोकसत्ता टीम

६) संविधानाने दिलेली समानता जपूया,
कर्तव्यांतूनच खरे स्वातंत्र्य जपूया।
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

७) लोकशाही ही केवळ व्यवस्था नाही,
ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे।
प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

८) तिरंग्याच्या प्रत्येक रंगात
त्याग, शौर्य आणि आशा दडलेली आहे।
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

Republic Day 2025 Wishes
: प्रजासत्ताक दिन २०२६ साजरा करण्यासाठी शुभेच्छा संदेश, प्रेरणादायक कोट्स आणि Greetings (फोटो सौजन्य : लोकसत्ता टीम

९) देश मजबूत होतो तेव्हा
नागरिक जागरूक असतात।
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

१०) एक विचार, एक संविधान,
असंख्य स्वप्नांचा भारत।
प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

११) ज्यांनी देशासाठी रक्त सांडले,
तेच झाले अमर इतिहास!
त्यांच्या त्यागातूनच उभा राहिला
स्वाभिमानी भारत महान आज!
प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

१२) स्वप्न नव्हते स्वतःचे ज्यांचे,
राष्ट्रच होते जीवन!
त्यांच्या बलिदानावर उभे आहे
लोकशाही भारताचे संविधान!
प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

Republic Day 2025 Wishes
: प्रजासत्ताक दिन २०२६ साजरा करण्यासाठी शुभेच्छा संदेश, प्रेरणादायक कोट्स आणि Greetings (फोटो सौजन्य : लोकसत्ता टीम

१३) हुतात्म्यांच्या पावलावर पाऊल ठेवून,
पुढे चालूया निर्धाराने!
त्यांच्या त्यागाचे ऋण फेडूया
संविधान जपण्याच्या विचाराने!
प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

१४) रक्त, घाम आणि त्यागाने
ज्यांनी घडवला देश आपला!
त्यांच्या स्मरणानेच आज
तिरंगा अधिक अभिमानाने फडकतो!
प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

१५) समस्तां बंधु मानावे,
जगाला प्रेम अर्पावे।
प्रजासत्ताक दिनाच्या प्रेममय शुभेच्छा!

१६) स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला अमुचा सुंदर देश,
आम्ही सारे एक; जरी नाना जाती, नाना वेष…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

Republic Day 2025 Wishes
: प्रजासत्ताक दिन २०२६ साजरा करण्यासाठी शुभेच्छा संदेश, प्रेरणादायक कोट्स आणि Greetings (फोटो सौजन्य : लोकसत्ता टीम

१७) देश सर्वांपुढे मोठा आहे;
या देशासाठी लढणाऱ्या शूर वीरांना
शत्-शत् प्रणाम!
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

१८) हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे,
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे।
प्रजासत्ताक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा!

१९) बलसागर भारत होवो,
विश्वात शोभुनी राहो।
जनसेवे जीवन अर्पिले,
राष्ट्रार्थ प्राण हे उरले।
प्रजासत्ताक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा!

Republic Day 2025 Wishes
: प्रजासत्ताक दिन २०२६ साजरा करण्यासाठी शुभेच्छा संदेश, प्रेरणादायक कोट्स आणि Greetings (फोटो सौजन्य : लोकसत्ता टीम

२०) उत्सव राष्ट्राचा आभाळी सजला,
सलाम त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला।
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!