Republic Day Parade Live Telecast:  बुधवारी, देश ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. प्रजासत्ताक दिन परेडचे थेट प्रक्षेपण होणार आहे. याशिवाय प्रतिभावान तरुणांना ७३ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. प्रजासत्ताक दिनाचे परेड आणि बीटिंग रिट्रीट दोन्ही तुम्ही ऑनलाइन पाहू शकणार आहात, परंतु विविध अॅक्टिव्हिटीमध्ये देखील भाग घेऊ शकतील. प्रेक्षक ही परेड संरक्षण मंत्रालयाच्या युट्युब चॅनेलवरही पाहू शकतात. दूरदर्शनकडे या परेडचे प्रक्षेपण दाखवण्याचे हक्क आहेत. पीआयबी आणि सरकारच्या अनेक सोशल प्लॅटफॉर्मवरही परेडचे थेट प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. लाइव्ह स्ट्रीमद्वारे तिकिट कशी मिळवायची आणि लाइव्ह कुठे पाहू शकतो, जाणून घेऊयात सविस्तर…

या वर्षी पहिल्यांदाच ही परेड सकाळी १० वाजता सुरू होणार नाही तर १०.३० वाजता सुरू होईल. म्हणजेच दरवर्षीपेक्षा अर्धा तास उशिराने हे लाइव्ह सुरू होणार आहे. एकूण ९० मिनिटांची ही परेड असून जवळपास ८ किमी अंतरावरची ही परेड असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडिया गेटजवळील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देण्यापासून ते परेड संपेपर्यंत राज्य प्रसारक दूरदर्शनच्या यूट्यूब चॅनेलवर परेडचे थेट प्रक्षेपण केले जाईल. दूरदर्शनच्या YouTube चॅनेलवर परेडचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहू शकता. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) आपल्या यूट्यूब चॅनेलवर प्रजासत्ताक दिन परेडचे थेट प्रक्षेपण करेल. PIB च्या YouTube चॅनेलवर सुद्धा परेडचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही पाहू शकता.

indias first hydrogen powered ferry
विश्लेषण : पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बोटीचे उदघाटन, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
morarji desai drink urine
माजी पंतप्रधान मोरारजी देसाई खरंच ‘शिवांबू’ प्राशन करायचे? जाणून घ्या
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?
voting rights in India right to vote in constitution of india
संविधानभान : देशाचा प्राणवायू!

आणखी वाचा : देशाचा ७३वा प्रजासत्ताक दिन! जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

तुम्ही घरी बसूनही या परेडचा आनंद घेऊ शकता. तुम्ही ही भव्य परेड डिश टीव्ही, एअरटेल आणि टाटा स्काय यांसारख्या डीटीएच कनेक्शनद्वारे किंवा स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर ऑनलाइन पाहू शकता. संरक्षण मंत्रालयाने प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम थेट दाखवण्यासाठी http://www.indianrdc.mod.gov.in वेबसाइट आणि ‘Indian RDC’ नावाचे YouTube चॅनल देखील तयार केले आहे.

नोंदणी कशी कराल ?
नोंदणी करण्यासाठी तुम्हाला https://www.mygov.in/rd2022 ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर ‘Register now’ वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा तपशील प्रविष्ट करा आणि आता एक OTP प्राप्त होईल. त्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ते प्रविष्ट करावे लागेल.

जर तुम्हाला राजपथवर परेड पाहण्याची इच्छा असेल तर तुम्ही पुढील ठिकाणी तिकीट खरेदी करू शकता – सेना भवन (गेट क्र. 2), शास्त्री भवन काउंटर (गेट 3 जवळ), जामनगर हाऊस (इंडिया गेट समोर), प्रगती मैदान (गेट). ) 1), संसद भवन स्वागत कार्यालय – संसद सदस्यांसाठी विशेष काउंटर उभारण्यात आले आहेत. २६ जानेवारीला तिकीट काउंटर बंद राहतील.

तुम्हाला एका पाससाठी २० ते ५०० रुपये खर्च करावे लागतील. राजपथवर एकूण २४ हजार लोकांना येण्याची परवानगी आहे, त्यापैकी १९ हजार आमंत्रित पाहुणे आहेत. इतर लोकांसाठी फक्त ५ हजार पास उपलब्ध आहेत. तसंच एका ओळखपत्रावर फक्त एकच पास दिला जाईल.