scorecardresearch

व्यायामाचा अभाव नव्हे, खाण्यामुळे स्थूलता

झपाझप चालण्याचा ज्यांना कंटाळा आहे. त्यांच्या अंगाला चरबी चिकटत जाते आणि बघता नजरेत भरणारी स्थूलता चालणेच अवघड करून ठेवते, हा झाला आजवरचा डॉक्टरांचा सल्ला.

झपाझप चालण्याचा ज्यांना कंटाळा आहे. त्यांच्या अंगाला चरबी चिकटत जाते आणि बघता नजरेत भरणारी स्थूलता चालणेच अवघड करून ठेवते, हा झाला आजवरचा डॉक्टरांचा सल्ला. पण चालणं सोडून जरी एखाद्याने साखरेचे अतिप्रमाणात सेवन केल्यास गोलमटोल होण्यास फार वेळ लागणार नाही. साखरेबरोबर कबरेदकेही स्थूलता वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात, असा दावा एका भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने नुकत्याच केलेल्या संशोधनात केला आहे.
क्रीडा औषधीवरील एका नियतकालिकातील संपादकीय पानावर या संशोधनातील माहिती प्रसिद्ध झाली आहे. असीम मल्होत्रा आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी व्यायामाच्या अभावामुळे स्थूलता वाढत असल्याच्या मिथकाला मूठमाती देण्याची वेळ आल्याचे लेखात म्हटले आहे. निरोगी जीवनातील व्यायामाचे योगदान संशयातीत आहे. हे आम्ही सांगायला विसरणार नाही. मधुमेह, हृदयरोग आणि मानसिक आजारांना दूर ठेवण्यासाठी व्यायाम हा असलाच पाहिजे. परंतु स्थूलता घालवण्यासाठी व्यायामाची अनुपस्थिती क्षम्य आहे. व्यायामाचा शरीरातील स्थूलतेवरील प्रभाव फारच कमी आहे, असे मल्होत्रा यांनी स्पष्ट केले आहे.  
व्यायामाचे वेळापत्रक सांभाळू न शकणाऱ्या अनेकांना आमचे सांगणे आहे की, सकाळी अथवा संध्याकाळी व्यायाम झेपत नसेल तर किमान जिभेवर नियंत्रण ठेवण्याची मोठी जबाबदारी पेलता आली पाहिजे. तरच स्थूलतेला आव्हान देता येईल. अन्यथा, एक ते दोन तास घाम गाळण्याने स्थूलता कमी होईल आणि आपण सडपातळ होऊ असा कुणाचा जर समज असेल त्यांनी लवकरच जागे होणे गरजेचे आहे.
चमचमीत खा नि व्यायामही करा!
जिभेला चमचमीत खाण्याची सवय ठेवत असाल तर हे ध्यानात ठेवा की तितकाच व्यायामही शरीराला गरजेचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पुराव्यांनिशी बोलायचे तर ज्या ४० टक्के लोकांमध्ये स्थूलता आहे. त्यांच्यातील चरबीचे प्रमाण कमी होण्यास कोणतीही मदत झालेली नाही. याचे एकच कारण म्हणजे कबरेदके आणि साखरेचे शरीरातील अतिप्रमाण, हेच सांगावे लागेल. त्यामुळे भविष्यात लोकांनी साखर आणि कबरेदकयुक्त पदार्थ खाण्यापासून स्वत:ला आवरले पाहिजे, असेही त्यांनी या वेळी नमूद केले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rise in obesity due to over eating

ताज्या बातम्या