BP and Heart Health Can Improve Naturally with One Simple Daily Vegetable: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत हृदयाशी संबंधित तक्रारी झपाट्याने वाढताना दिसत आहेत. वाढलेला रक्तदाब, शरीरात साचलेले चरबीचे घटक, असंतुलित आहार आणि सततचा मानसिक ताण यांमुळे हृदयाची कार्यक्षमता हळूहळू कमी होत चालली आहे. लहान वयातच लोकांना थकवा, छातीत जडपणा, धडधड वाढणे अशा लक्षणांचा सामना करावा लागत आहे. त्यामागे बदललेली जीवनशैली, चुकीचा आहार, सततचा मानसिक ताण आणि शरीराला न झेपणारी दिनचर्या कारणीभूत ठरत आहे.

बहुतेक वेळा लोक औषधांवर अवलंबून राहतात; मात्र खरा प्रश्न आहे तो आपल्या रोजच्या ताटात काय आहे याचा. कारण- योग्य आहारच हृदयाला बळकटी देतो, रक्ताभिसरण सुरळीत ठेवतो आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. दुर्दैवाने झटपट मिळणाऱ्या, तेलकट आणि कृत्रिम पदार्थांकडे वाढलेला ओढा शरीराच्या मुळावर उठत आहे.

याच पार्श्वभूमीवर योग व आयुर्वेद क्षेत्रातील आचार्य बालकृष्ण यांनी एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला आहे. त्यांच्या मते, अनेकदा आपण आरोग्यासाठी महागडे उपाय शोधतो; पण आपल्या स्वयंपाकघरातच असा एक घटक आहे, जो हृदयासाठी अमृतासारखा ठरू शकतो. विशेष म्हणजे हा उपाय अतिशय सोपा, सहज उपलब्ध आणि कोणत्याही मोठ्या बदलांशिवाय आहारात समाविष्ट करता येण्यासारखा आहे.

Award Banner

आचार्य बालकृष्ण सांगतात की, काही नैसर्गिक अन्नपदार्थ असे असतात, जे शरीरातील अपायकारक घटक कमी करण्याचे काम करतात. त्यामध्ये तंतुमय अन्नघटकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. असे घटक शरीरातील अपायकारक चरबी कमी करणे, रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवणे आणि हृदयाच्या ठोक्यांचे संतुलन राखणे यांसाठी मदत करतात. त्यामुळे रक्तदाब आटोक्यात राहतो आणि हृदयावर येणारा ताण कमी होतो.

त्याशिवाय पचनसंस्था ही आपल्या एकंदर आरोग्याचा कणा मानली जाते. पचन नीट होत असेल, तर शरीरात पोषक घटकांचे शोषण चांगल्या प्रकारे होते, वजन नियंत्रणात राहते आणि थकवा जाणवत नाही. त्यामुळे हृदय आणि रक्तदाबाच्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी पचन सुधारण्यावरही लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे.

आचार्यांच्या मते, रोजच्या आहारात एका विशिष्ट हिरव्या भाजीकडे लोक फारसे लक्ष देत नाहीत. ही भाजी स्वस्त, सहज मिळणारी असूनही तिचे फायदे अनेकांना माहीत नाहीत. नियमित आणि योग्य प्रमाणात तिचा समावेश केल्यास हृदय निरोगी राहणे, रक्तदाब संतुलित ठेवणे आणि शरीर तंदुरुस्त ठेवणे यांसाठी मोठी मदत होते.

आचार्य बालकृष्ण ज्या हिरव्या भाजीचा उल्लेख करतात, ती म्हणजे हिरवी बीन्स. मराठीत तिला फरसबी, असे म्हणतात. ही भाजी नैसर्गिक तंतूंनी समृद्ध असून, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास, हृदय मजबूत करण्यास व पचनसंस्था सुधारण्यास अत्यंत उपयुक्त ठरते. भाजी, उसळ, वाफवून किंवा हलक्या फोडणीसह फरसबीचा नियमित आहारात समावेश केल्यास हृदय निरोगी ठेवण्यात मोठी मदत मिळू शकते. त्यामुळे आजपासूनच या साध्या, पण प्रभावी भाजीकडे दुर्लक्ष न करता, ती आपल्या रोजच्या आहारात नक्कीच समाविष्ट करा आणि हृदयाला नैसर्गिक बळ द्या.