scorecardresearch

हॉर्नच्या आवाजामुळे वाढतो उच्च रक्तदाबाचा धोका ! काय सांगते संशोधन, जाणून घ्या

High Blood Pressure :आजकाल बऱ्याच जणांना उच्च रक्त दाबाचा त्रास होताना दिसतो. मात्र त्याकडे दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकतो.

blood pressure
हॉर्नच्या आवाजामुळे उच्च रक्तदाबाचा धोका

High Blood Pressure : भारतात वाहतूकीची ट्रॅफिकची मोठी समस्या आहे. घराबाहेर पडल्यावर गाड्यांचे आवाज सतत ऐकायला मिळतात.एकेकाळी पुढे जायचे असेल तर हॉर्न वाजवा असे सांगितले जात होते.आता मात्र विविध प्रकारच्या कर्णकर्कश आवाजांमुळे सर्वच त्रस्त झाल्याने नो हॉर्न अशी विनंती करण्याची वेळ आली आहे. जगाच्या पाठीवर कुठेही जा प्रदूषण पाठ सोडत नाही.घरात असा, घराबाहेर असा किंवा निसर्गाच्या सान्निध्यात, प्रदूषणाचा विळखा आपल्या पाठीशी असतोच. याच कर्णकर्कश आवाजांचे बरेच धोके आहेत जे आपल्याला माहित नाहीत. चला तर मग जाणून घेऊ काय धोके आहेत.

उच्च रक्तदाब समस्या –

रस्त्यावर प्रचंड रहदारी असते त्यामुळे ट्राफिकची समस्या सगळ्यांनाच भेडसावते. त्यात ट्राफिक म्हंटल्यावर हॉर्नचे आवाज आलेच. मात्र एका संशोधनातून असे समोर आले आहे की, या आवाजाचा सर्वात मोठा धोका हा उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना अधिक आहे. याच आवाजामुळे उच्च रक्तदाबाचा धोका अधिक वाढू शकतो. आजकाल बऱ्याच जणांना उच्च रक्त दाबाचा त्रास होताना दिसतो. मात्र त्याकडे दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकतो. उच्च रक्तदाब व्यक्तीस हळू हळू मृत्यूच्या दारात घेऊन जातो, म्हणूनच या रोगाला सायलेंट किलर असे म्हणतात. अयोग्य जीवनशैली अपूर्ण झोप, व्यायामाचा अभाव अशा अनेक घातक सवयी उच्च रक्तदाबासाठी कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे या समस्येचा सामना करणाऱ्यांना डॉक्टर जीवनशैली सुधारण्याचा, चौरस आहार, पुरेशी झोप आणि व्यायामाचा सल्ला देतात. सामान्य रक्तदाब १२०/८० mmHg पर्यंत असते. १२० ते १४० सिस्टोलिक आणि ८० ते ९० डायस्टोलिक च्या दरम्यान असणाऱ्या रक्तदाबाला प्री-हायपरटेंशन म्हटले जाते. तर १४०/९० पेक्षा जास्त आकडा आल्यास त्याला हाय ब्लड प्रेशर मानले जाते.वयानुसार ही रेंज बदलत राहते.

हेही वाचा – रविवार स्पेशल: हेल्दी आणि चविष्ट तिखट आप्पे; पाहा झटपट सोपी मराठी रेसिपी

उच्च रक्तदाबाची लक्षणे –

वेबएमडीच्या अहवालानुसार, चक्कर येणे, घबराट होणे, घाम येणे आणि झोपेची तीव्रता उच्च रक्तदाबची लक्षणे असू शकतात. परंतु ही लक्षणे इतकी सामान्य आहेत की इतरही अनेक कारणे असू शकतात. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार डोळ्यातील रक्तदाबाला सबकंजंक्टिव्हल रक्तस्राव म्हणतात उच्च रक्तदाबाचा इशारा असू शकतो. तज्ञांचे म्हणणे आहे की, म्हणतात की डोळ्यातील ब्लड स्पॉट हे मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांचे सामान्य लक्षण आहे. उपचार न केल्याने उच्च रक्तदाबांमुळे डोळ्यातील ऑप्टिक नसा गमावू शकतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 16:09 IST

संबंधित बातम्या