रॉयल एनफिल्डची ‘क्लासिक ३५०’ आज भारतात झाली लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

येत्या 24 तासांच्या आत २०२१ रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० भारतीय बाजारात लॉंच करणार आहे. या कंपनीची सर्वात लोकप्रिय बाईक आहे.

royal enfild
रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० ही बहुप्रतिक्षित बाईक भारतीय बाजारात झाली लॉंच ( Photo : www.royalenfield.com )

भारताची प्रसिद्ध बाईक तयार करणारी कंपनी रॉयल एनफील्डने रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० ही बहुप्रतिक्षित बाईक भारतीय बाजारात लॉंच केली आहे. या कंपनीची ही सर्वात लोकप्रिय बाईक आहे. अशातच २००९ मध्ये लॉंच करण्यात आलेली पहिली जनरेशन रॉयल एनफील्डला ग्राहकांनी मोठा पाठिंबा दिला होता. या करिता या कंपनीने ग्राहकांसाठी नवीन रॉयल एनफील्ड मध्ये कोणतेही बद्दल केलेले नाहीत. तर तुम्हाला या बाइकची अधिकृत बुकिंग आज सायंकाळी ६ वाजेपासून सुरू केली जाणार आहे. ग्राहक या बाइकला कंपनीचे डिलरशीप आणि अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकतील. जाणून घ्या या बाईकची किंमत आणि फीचर्स.

रॉयल एनफील्ड क्लासिक ३५०ची किंमत

नवीन जनरेशनची रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० ह्या नवीन मॉडेलच्या बाईकची सुरुवातीची किंमत १ लाख ८४ हजार ३७४ रुपये इतकी आहे.

रॉयल एनफील्ड क्लासिक ३५०चे फीचर्स

नवीन Classic 350 कंपनीचे नवीन “J” मॉड्यूलर आर्किटेक्चरवर बेस्ड आहे. कंपनीने २०२१ रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० ही बाईक सिंगल चॅनेल ABS व्हेरिएंट आणि ड्युअल-चॅनेल ABS व्हेरिएंट मध्ये लॉंच केली आहे. याशिवाय ग्राहकांना या बाईकमध्ये सिंगल सीट आणि डबल(ड्युअल)सीट निवडण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आलेला आहे. नवीन Classic 350 ला रेडिट्च, हेलकॉन, सिग्नल्स, डार्क आणि क्रोम सह एकूण पाच ट्रिम मध्ये आणले गेले आहे. याशिवाय कंपनी ११ रंगाच्या ऑप्शनसह ही बाईक भारतीय बाजारात आली आहे.

या बाईकच्या समोर ४१ फॉर्क्स मिमी टेलिस्कोपिक काटे आणि मागच्या भागात ड्युअल शॉक अॅब्झॉर्बर्स देण्यात आले आहे. तसेच ३००  मिमी डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 270 मिमी डिस्क ब्रेक दिलाय. तर या नवीन बाईकचे वजन सुमारे १९५ किलो आहे.

या बाईकच्या पॉवर परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाल्यास नवीन जनरेशन क्लासिक ३५० मध्ये नवीन ३४९ सीसी सिंगल सिलिंडर एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे.  जे जास्तीत जास्त २०.२ bhp ची पॉवर आणि २७ Nm ची पीक टॉर्क जनरेट करेल. यात तुम्हाला ५ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Royal enfields new bike classic 350 will be launched in india today find out the price and features scsm