आहार तज्ज्ञ रुजुता दिवेकर या नेहमी आपल्या इन्स्टाग्रामवर पोषक आहारासंबंधी पोस्ट करत असतात. वजन कमी करण्यासाठी कोणते आहार घ्यावे, कोणता व्यायाम करावा, चालण्याचे फायदे इत्यादी लोकोपयोगी सल्ले त्या देतात. मात्र अलिकडे त्यांनी एक मजेदार सल्ला दिला आहे. हा सल्ला वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि वाचून झाल्यावर हसू देखील येईल.

जागतिक हृदय दिवसाच्या पार्श्वभूमीवर रुजुता यांनी ही पोस्ट केली. यामध्ये त्यांनी वाईन ही शरीरासाठी चांगली असल्याचे म्हटले. पण त्यांनी पुढे जे लिहिले ते पाहून तुम्हाला चांगलाच हशा पिकेल. त्या म्हणाल्या वाईन ही हृदयासाठी चांगली आहे. केवळ इतके करा की, तिला जिमला न्या आणि घरी परत आणा पण तिचा घोट घेऊ नका. चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून ३ वेळा असे करा, असा मजेदार सल्ला रुजुता यांनी दिला.

Girish Mahajan criticizes Eknath Khadse in jalgaon
“माझ्यामुळे भाजप आहे, म्हणणारे आता थप्पीला” गिरीश महाजन यांच्याकडून एकनाथ खडसे लक्ष्य
Shrikant Shinde, Sanjay Raut, Shrikant Shinde news,
श्रीकांत शिंदे म्हणतात, संजय राऊतांच्या उपचाराचा खर्च आम्ही करू
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Raj Thackeray
“शिंदे-फडणवीस मला सतत…”, राज ठाकरेंनी सांगितलं अमित शाहांची भेट घेण्याचं कारण

सुरुवातीची ओळ वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असावा, मात्र नंतरच्या ओळी वाचून त्यांनी फार योग्य सल्ला दिल्याचे तुम्हाला वाटेल. रुजुताच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी खूप प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरने हा खूपच छान सल्ला असल्याचे म्हटले, तर एका यूजरने त्यांच्या विषयी अभिमान वाटत असल्याचे म्हटले . तर एका यूजरने आम्ही वाईनशिवायही जीमला जाऊ शकतो अशी प्रतिक्रिया दिली. तर एका यूजरने मी पहिल्यांदा तुमच्याशी सहमत नसल्याचे म्हटले आहे.