भारतीय रुपयाने डॉलरच्या तुलनेत घेतली मोठी झेप, जाणून घेऊयात आता कोणती पातळी गाठलीय

तज्ज्ञांच्या मते, फेडरल रिझर्व्हकडून दर वाढवण्याचा उत्साह नसल्यामुळे डॉलरवर दबाव वाढला आणि रुपयाने मजबूती नोंदवली.

lifestyle
भारतीय चलनाने डॉलरच्या तुलनेत नोंदवली मोठी तेजी (photo: indian express/ प्रतिनिधिक)

भारतीय रुपयाने ८ नोव्हेंबर २०२१ रोजी डॉलरच्या तुलनेत मोठी झेप घेतली आहे. दरम्यान काल परकीय चलन बाजार बंद झाल्यावर डॉलरच्या तुलनेत रुपया ४३ पैशांनी वाढून ७४.०३ वर पोहोचला. आंतरबँक परकीय चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया ७४.२५ च्या पातळीवर उघडला. यानंतर याचा उच्चांकी ७३.९८ आणि नीचांकी ७४.२५ वर पोहोचला. देशांतर्गत शेअर बाजारातील सकारात्मक कलामुळे रुपयाला आधार मिळाला.

परकीय चलन बाजारात दिवसभराच्या अस्थिरतेनंतर, देशांतर्गत चलन (भारतीय चलन) गुरुवारच्या तुलनेत घसरले आणि ७४.०३ च्या पातळीवर बंद झाले. गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ७४.४६ वर बंद झाला होता. दिवाळी बलिप्रतिपदेमुळे शुक्रवारी विदेशी चलन बाजार बंद होते. तज्ज्ञांच्या मते, फेडरल रिझर्व्हकडून दर वाढवण्याचा उत्साह नसल्यामुळे डॉलरवर दबाव वाढला आणि रुपयाने मजबूती नोंदवली.

डॉलर निर्देशांक घसरला

सहा प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची तुलनात्मक स्थिती दर्शविणारा डॉलर निर्देशांक ०.०४ टक्क्यांनी घसरून ९४.२८ च्या पातळीवर व्यवहार करत होता. LKP सिक्युरिटीजचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक जतिन त्रिवेदी यांनी सांगितले की रुपया ७३.७५च्या पातळीवर जाऊ शकतो. ब्रेंट क्रूड फ्युचर्स १ टक्क्यांनी वाढून $८३.५७ प्रति बॅरलवर पोहोचले.

शेअर बाजार वेगाने फिरतात

भारतीय शेअर बाजारात, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्स ४७७.९९ अंकांच्या वाढीसह ६०,५४५.६१ वर बंद झाला. त्याच वेळी, राष्ट्रीय शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक निफ्टी १५१.७५ अंकांच्या म्हणजेच ०.८५ टक्क्यांच्या वाढीसह १८,०६८.५५ वर बंद झाला. एक्सचेंज डेटानुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गुरुवारी भारतीय शेअर बाजारात प्रचंड नफा कमवला आणि ते निव्वळ विक्रेते बनले. या दिवशी त्यांनी ३२८.११ कोटी रुपयांच्या शेअर्सची निव्वळ विक्री केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rupee strengthened by 43 paise against dollar know new level of indian currency gold crude price scsm

Next Story
स्वच्छ पाणी आणि साबणाने मुलांच्या चालनेत वाढ