सॅमसंग या भारतातील इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅंडने तुम्‍हाला तुमच्‍या घरामध्‍येच भव्य आकारातील स्क्रिनवर सिनेमा पाहण्‍याचा आनंद देण्‍यासाठी ‘दि प्रिमिअर’ ही प्रोजेक्‍टर्सची अल्‍ट्रा-प्रिमिअम श्रेणी लॉंच केली आहे. ‘दि प्रिमिअर’ ऑन-इन-वन सुसंगत, जागेच्‍या बचत करणा-या डिझाइनसह येतो. हा प्रोजेक्‍टर तुमच्‍या घरातील लिव्हिंग स्‍पेसमध्‍ये सहजपणे मावतो. अल्‍ट्रा-शॉर्ट-थ्रो प्रोजेक्‍टर असलेला ‘दि प्रिमिअर’ भिंतीपासून योग्‍य अंतरावर (११.३ सेमी) असलेले कॉफी टेबल किंवा ड्रॉवर्सवरील भागावर ठेवता येऊ शकतो आणि जवळपास १३० इंचापर्यंतच्‍या हाय-क्‍वॉलिटी स्क्रिनवर मनोरंजनाचा आनंद घेता येऊ शकतो.

कसा आहे हा प्रोजेक्टर?

आकर्षक सफेद रंगातील डिझाइन, कर्व्ह कडा व आकर्षक फॅब्रिक फिनिश असलेला ‘दि प्रिमिअर’ तुमच्‍या घराच्‍या सजावटीमध्‍ये भरही घालतो. आकर्षक लुकसह ‘दि प्रिमिअर’ त्‍याच्‍या अल्‍ट्रा-शॉर्ट थ्रो क्षमतांसह सुसंगत व टिकाऊ आहे. सुलभपणे इन्‍स्‍टॉल होणारा आणि बदलती जीवनशैली व इंटीरिअर डेकॉर ट्रेण्‍ड्सशी मिळता-जुळता ‘दि प्रिमिअर’ तुमच्‍या लिव्हिंग रूममध्‍ये सहजपणे सामावून जात घराच्‍या आकर्षकतेमध्‍ये अधिक भर घालतो.

उपलब्धी

मंगळवारपासून ‘दि प्रिमिअर’ LSP9T व LSP7T या अनुक्रमे १३० इंच व १२० इंच स्क्रिन आकाराच्‍या मॉडेल्‍समध्‍ये उपलब्‍ध असेल. या प्रोजेक्‍टरमध्‍ये लेझर संचालित ४के पिक्‍चर रिझॉल्‍यूशन आहे. ‘दि प्रिमिअर LSP9T’ हा ट्रिपल लेझर तंत्रज्ञानाने युक्‍त जगातील पहिला एचडीआर१०+ प्रमाणित प्रोजेक्‍टर आहे.

वेगेवगळे मोड

‘दि प्रिमिअर’ प्रोजेक्‍टरमध्‍ये फिल्‍ममेकर मोड देखील आहे, ज्‍यामुळे युजर्स दिग्‍दर्शकांना अपेक्षित असलेल्‍या स्‍वरूपात चित्रपट पाहण्‍याचा आनंद घेऊ शकतात. या स्‍मार्ट प्रोजेक्‍टरमध्‍ये सॅमसंगचे स्‍मार्ट टीव्‍ही प्‍लॅटफॉर्म आणि नेटफ्लिक्‍स, अॅमेझॉन प्राइम, यूट्यूब इत्‍यादी सारख्‍या प्रमुख कन्‍टेन्‍ट भागीदारांचे स्ट्रिमिंग व्हिडिओ अॅप्‍स आहेत. याखेरीज   टॅप व्‍ह्यू व मिररिंग यांसारखी मोबाइल कनेक्‍टीव्‍हीटी फीचर्स देखील आहेत. युजर्स गेम मोडच्‍या माध्‍यमातून जवळपास १३० इंच इतक्‍या भव्य आकाराच्‍या स्क्रिनवर सर्वोत्तम, व्‍यापक गेमिंग अनुभवाचा आनंद देखील घेऊ शकतात.

‘दि प्रिमिअर’मध्‍ये बिल्‍ट-इन वूफर्स व अकॉस्टिक बीम सराउंड साउंड आहे, ज्‍यामुळे प्रोजेक्‍टरमधून सिनेमा पाहण्‍याचा सर्वोत्तम अनुभव मिळतो आणि अतिरिक्‍त साउंड उपकरणाची गरज भासत नाही. प्रोजेक्‍टरमध्‍ये साउंड इन-बिल्‍ट आहे यामुळे लिव्हिंग स्‍पेस थिएटर किंवा सभागृहामध्‍ये बदलून जाते.

किंमत, ऑफर्स, कुठे खरेदी करावे?

‘दि प्रिमिअर’ १० ऑगस्‍ट २०२१ पासून सॅमसंगचे ऑफिशियल ऑनलाइन स्‍टोअर सॅमसंग शॉप आणि निवडक सॅमसंग स्‍मार्ट प्‍लाझा येथे दोन मॉडेल्‍समध्‍ये उपलब्‍ध असेल. ‘दि प्रिमिअर’चे LSP9T मॉडेल ६,२९,९०० रूपये किंमतीमध्‍ये उपलब्‍ध आहे, तर LSP7T मॉडेल ३,८९,९०० रूपये किंमतीमध्‍ये उपलब्‍ध आहे. प्रथम खरेदी करणा-या सुरूवातीच्‍या ग्राहकांना सॅमसंगच्‍या ऑफिशियल ऑनलाइन स्‍टोअरमधून दोनपैकी कोणत्‍याही मॉडेलच्‍या खरेदीवर कॉम्प्लिमेंटरी अॅमेझॉन इको प्‍लस मिळेल. सर्व प्रोजेक्‍टर्स १२ महिन्‍यांच्‍या वॉरण्‍टीसह येतील.