सॅमसंग कंपनीने काही दिवसांपूर्वीच आपल्या अनेक मोबाइलच्या किंमतीत बदल केला, आता कंपनीने Galaxy A70s या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. नवीन स्मार्टफोन Galaxy A71 लाँच होण्याआधी कंपनीकडून Galaxy A70s च्या किंमतीत 3,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

फीचर्स –
Android pie वन यू आय (one UI) टेक्नॉलॉजीवर आधारीत या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम कार्ड आहे. फिंगरप्रिंट सेन्सर हे फीचर यामध्ये दिले असून 6.7 इंच AMOLED फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये मागील बाजूस ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असून त्यात 32 मेगापिक्सल सेन्सरचा प्राईम कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा वाईड सेन्सर लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर लेन्स आहे. याशिवाय फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही आहे. फोनची बॅटरी 4500 mAh इतकी आहे. 2.0GHz ऑक्टोकॉर प्रोसेसर असलेला हा फोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी स्टोरेज व 8 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी अशा दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ही देण्यात आला आहे.

किंमत –
Galaxy A70s हा स्मार्टफोन भारतात गेल्यावर्षी लाँच करण्यात आला होता. त्यावेळी 28,999 रुपये इतकी या स्मार्टफोनच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत होती. पण आता हा फोन 25,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याशिवाय 8जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटच्या किंमतीतही कपात झाली असून 27,999 रुपयांमध्ये हा फोन खरेदी करता येईल. सॅमसंग ऑनलाइन स्टोअर, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध आहे.