Samsung Galaxy M52 5G आज भारतात झाला लॉंच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू आणि व्हाईट कलर ऑप्शनमध्ये येत आहे.

lifestyle
स्मार्टफोनची भारतीय बाजारात किंमत ३४,९०० रुपये इतकी आहे.

साऊथ कोरियन स्मार्टफोन मेकर कंपनी सॅमसंग (Samsung) आज त्यांचा नवा Samsung Galaxy M52 5G हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉंच करण्यात आला आहे. फोनचे लाँचिंग दुपारी १२ वाजता व्हर्च्युअल इव्हेंटद्वारे केले गेले आहे. हा फोन अलीकडेच पोलिश बाजारात लाँच करण्यात आला होता. यामध्ये ६४ मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा असून या फोनमध्ये ५००० mAh बॅटरी, स्नॅपड्रॅगन ७७८G प्रोसेसर आणि सुपर AMOLED प्लस डिस्प्ले यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. जाणून घेऊयात या स्मार्टफोन बद्दलचे खास माहिती.

सॅमसंग गॅलक्सि m५२ ५जी ची किंमत

Samsung Galaxy M52 5G दुपारी १२ वाजता लाँच केला गेला आहे. डिव्हाइस सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट आणि Amazon वर हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध असेल. सॅमसंग गॅलक्सि m५२ ५जी या स्मार्टफोनची भारतीय बाजारात किंमत ३४,९०० रुपये इतकी आहे. तसेच हा स्मार्टफोन तुम्हाला amazon वर खास ऑफरसह विकत घेता येणार आहे. तुम्ही हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू आणि व्हाईट कलर ऑप्शनमध्ये येत आहे.

सॅमसंग गॅलक्सि m५२ ५जी चे स्पेसिफिकेशन्स

भारतात लॉंच झालेल्या Samsung Galaxy M52 5G या स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा फुलएचडी+Super AMOLED डिस्प्ले २४००x१०८० पिक्सल रिज्योल्यूशनसह देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. यात Qualcomm Snapdragon ७७८G प्रोसेसर ६ जिबी रॅम आणि १२८ जिबी इंटरनल स्टोरेजसह देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून यात ६४MP चा मेन कॅमेरा, १२MP चा सेकंडरी शूटर आणि ५MP चा मायक्रो स्नॅपर चा अंतर्भाव आहे. त्याचबरोबर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ३२MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Galaxy M52 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी २५W चर्जिंग सपोर्ट देण्यात आली आहे. कनेक्टीव्हीटीसाठी यात GPS/ A-GPS, NFC, 5G, 4G LTE आणि USB Type-C port देण्यात आलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Samsung galaxy m52 5g launches in india today find out the price and specifications scsm

ताज्या बातम्या