Jio युजर्सना डबल डेटा बेनिफिट्स, सॅमसंगच्या Galaxy S20, Galaxy S20+ चा पहिला सेल

सॅमसंगच्या 5G कनेक्टिव्हिटी सपोर्ट असलेल्या स्मार्टफोन्सचा पहिल्यांदाच सेल…

सॅमसंग कंपनीने आपली फ्लॅगशीप स्मार्टफोन गॅलेक्सी एस२० सीरिज काही दिवसांपूर्वी लाँच केली होती. या सीरिजअंतर्गत कंपनीने Galaxy S20, Galaxy S20+ आणि Galaxy S20 Ultra हे तीन फोन लाँच केले आहेत. Galaxy S20 Ultra मध्ये १०८ मेगापिक्सलपर्यंत प्रायमरी कॅमेरा आणि ४० मेगापिक्सलपर्यंत सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या तिन्ही स्मार्टफोनमध्ये ५जी कनेक्टिव्हिटी सपोर्ट आहे, पण भारतात अद्याप ५जी कनेक्टिव्हिटी सुरू झालेली नसल्याने कंपनीने हे फोन ४जी आणि ५जी दोन्ही प्रकारात आणले आहेत. यातील Galaxy S20, Galaxy S20+ स्मार्टफोन आज पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. या फोन्ससाठी कंपनीने काही दिवसांपूर्वीच प्री-ऑर्डर घ्यायलाही सुरूवात केली होती. आजच्या सेलमध्ये या दोन्ही स्मार्टफोनच्या खरेदीवर नो-कॉस्ट ईएमआय, एक्स्चेंज डिस्काउंट आणि जिओ युजर्ससाठी डबल डेटा बेनिफिट्स अशा काही शानदार ऑफर्सचा समावेश आहे.

सॅमसंग कंपनीने आपली फ्लॅगशीप स्मार्टफोन गॅलेक्सी एस२० सीरिज काही दिवसांपूर्वी लाँच केली होती. या सीरिजअंतर्गत कंपनीने Galaxy S20, Galaxy S20+ आणि Galaxy S20 Ultra हे तीन फोन लाँच केले आहेत. यातील Galaxy S20, Galaxy S20+ स्मार्टफोन पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. या फोन्ससाठी कंपनीने काही दिवसांपूर्वीच प्री-ऑर्डर घ्यायलाही सुरूवात केली होती. सेलमध्ये या दोन्ही स्मार्टफोनच्या खरेदीवर नो-कॉस्ट ईएमआय, एक्स्चेंज डिस्काउंट आणि जिओ युजर्ससाठी डबल डेटा बेनिफिट्स अशा काही शानदार ऑफर्सचा समावेश आहे. सेलमध्ये क्लाउड पिंक, क्लाउड ब्लू, क्लाउड ब्लॅक आणि क्लाउड ग्रे अशा चार रंगांमध्ये हे फोन उपलब्ध आहेत.

Galaxy S20 फीचर्स :-
– ६.२ इंचाचा क्वॉड एचडी प्लस डायनॅमिक AMOLED 2x डिस्प्ले
– फुल एचडी रिझॉल्युशनचा हा फोन 120Hz चा रिफ्रेश रेट
– HDR10+ सर्टिफाइड डिस्प्ले
– ८ जीबी रॅमचा पर्यायसह १२८ जीबी इंटरनल स्टोरेज
– फोनची मेमरी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवता येणे शक्य
– फोटोग्राफीसाठी एस२० मध्ये ट्रिपल रिअर कॅमेऱ्यांचा सेटअप (६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १२ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स आणि १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स)
– सेल्फीसाठी १० मेगापिक्सलचा कॅमेरा
-२५ वॅटची फास्ट चार्जिंगसह 4000mAh क्षमतेची बॅटरी
-किंमत भारतात ६६ हजार ९९९ रुपये

Galaxy S20+ फीचर्स :-
– ६.७ इंचाचा क्वॉड एचडी प्लस डायमॅनिक AMOLED 2x डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट
-HDR10+ सर्टिफाइड डिस्प्ले
– ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी आणि १२ जीबी रॅम प्लस ५१२ जीबीपर्यंत स्टोरेजचे तान पर्याय(128GB, 256GB, and 512GB).
– मेमरी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने १ टीबी पर्यंत वाढवता येणे शक्य
– फोटोग्राफीसाठी फोनमध्ये रिअरमध्ये चार कॅमेऱ्यांचा सेटअप (६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, १२ मेगापिक्सलच्या दोन कॅमेऱ्यांसह एक डेप्थ सेन्सर)
– सेल्फीसाठी १० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
– फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4500mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे.
– या फोनची किंमत भारतात ७३ हजार ९९९ रुपये असणार आहे.

(आणखी वाचा – 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ‘हे’ बेस्ट स्मार्टफोन्स)

किंमत –
Galaxy S20 या स्मार्टफोनची किंमत भारतात ६६ हजार ९९९ रुपये आहे.
Galaxy S20+ या स्मार्टफोनची किंमत भारतात ७३ हजार ९९९ रुपये आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Samsung galaxy s20 s20 first sale know price offers specifications and all other details sas