scorecardresearch

Samudrik Shastra: नखांमुळे आरोग्यच नाही तर स्वभावही कळतो; पाहा तुमच्या नखाविषयी काय सांगतं सामुद्रिक शास्त्र

Samudrik Shastra: केवळ आरोग्यविषयीच नव्हे तर तुमच्या स्वभाव गुणवाविषयी सुद्धा तुमची नखं फार स्पष्ट भाष्य करतात.

Samudrik Shastra: नखांमुळे आरोग्यच नाही तर स्वभावही कळतो; पाहा तुमच्या नखाविषयी काय सांगतं सामुद्रिक शास्त्र
आज आपण जाणून घेऊया नखांच्या रचना आणि त्यावरून मिळणाऱ्या संकेतांबाबत.

Samudrik Shastra: तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या नखांच्या रंगापासून ते मजबूततेपर्यंत सर्वकाही हे तुमच्या आरोग्याविषयी संकेत देत असतं. शरीरात जाणवणारी कॅल्शियम कमी ते थायरॉईड सारख्या मोठ्या आजारांची चिन्ह तुमच्या नखांवर दिसतात. पण केवळ आरोग्यविषयीच नव्हे तर तुमच्या स्वभाव गुणवाविषयी सुद्धा तुमची नखं फार स्पष्ट भाष्य करतात. ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीच्या सवयी आणि शारीरिक लक्षण पाहून स्वभाव सांगणाऱ्या विद्येला सामुद्रिक शास्त्र असे संबोधले जाते. याच सामुद्रिक शास्त्रात तुमच्या नखांच्या आकार व रंगावरून स्वभावाची वैशिष्ट्य सांगण्यात आली आहेत, चला तर मग जाणून घेऊयात तुमची नखं तुमच्या स्वभावाविषयी काय सांगतात..

लांब नखे

अनेकांना नखं वाढवण्याची आवड असते पण काहींच्या बाबत मात्र काहीही केलं तरी नखे वाढतच नाहीत तर काहींच्या नखांना चांगली वाढ असते. यातून तुमच्या शरीरातील कॅल्शियमची पातळी लक्षात येते व सामुद्रिक शास्त्रानुसार तुमचा स्वभावही अधोरेखित होतो. असे म्हणतात की ज्यांची हातांच्या बोटांची नखं लांब असतात अशा व्यक्ती कल्पक असतात. त्यांच्या हटके विचारांमुळे ते प्रत्येक समस्येवर ताबडतोड उपाय शोधून काढतात. शिवाय ही मंडळी अक्षरशः उत्साहाचा खजिना असतात.

Samudrik Shastra: झोपण्याची पद्धत सांगते तुमचा स्वभाव; पोटावर झोपणारे बिनधास्त तर पाय दुमडून..

गोल अंडाकृती नखे

सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्या लोकांची नखे गोलाकार किंवा अंडाकृती असतात, असे लोक इतरांमध्ये लवकर मिसळून जातात, यांचा स्वभाव मुळातच मनमिळाऊ असतो. यांच्या आकर्षक बोलण्याने व आनंदी चेहऱ्यामुळे सर्वजण त्यांचे मित्र बनू इच्छितात.

रुंद नखे

सामुद्रिक शास्त्रानुसार ज्यांची नखे रुंद असतात ही मंडळी जेवढ्यास तेवढं अशा न्यायाने वागतात. अशा व्यक्तींना आपले काम करून घेणे जमते. अशा व्यक्ती चेहऱ्यावरून अत्यंत सामान्य व बोलण्यावरून अगदी साधी वाटत असली तरी त्यांना जे हवं आणि जसं हवं ते करून घेण्यात ते हुशार असतात.

Samudrik Shastra: पाय बघून ठेवा विश्वास; उंच अंगठा म्हणजे बोलबच्चन, तर चौरस पाय असल्यास..

त्रिकोणी नखे

त्रिकोणी नखांच्या व्यक्ती दुर्मिळ असतात, फार कमी जणांमध्ये अशा प्रकारचे फीचर आढळते. त्यांचा स्वभावही तितकाच वेगळा असतो. या व्यक्ती जिद्दी असतात पण सोबतच आरामालाही विशेष महत्त्व देतात. हुशारीने काम करून घेणे त्यांच्या स्वभावाचा मोठा भाग असते.

पिवळी नखे

पिवळी नखं केवळ अस्वच्छता नाही तर अशुभही मानली जातात. असं म्हणतात की पिवळी नखे असलेल्या पैशासंबधित त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच आरोग्याच्या अनेक तक्रारी त्यांना सतत सतावत असतात.

(टीप – सदर लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या