SBI ने ATM विथड्रॉलवर आणले नवे नियम: OTP च्या मदतीने काढले जाणार पैसे

एसबीआयने ग्राहकांना फसवणूकीपासून वाचवण्यासाठी एटीएममधून पैसे काढण्यासाठी नवीन नियम आणला आहे, ओटीपीच्या मदतीने रोख रक्कम काढली जाईल

lifestyle
स्टेट बँक ऑफ इंडियाने एसबीआय एटीएममधून ओटीपीद्वारे पैसे काढण्याचा अतिशय सोपा मार्ग तयार केला आहे. (photo: indian express)

एटीएम कार्डद्वारे फसवणुकीच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. हे लक्षात घेऊन स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी एक नवीन पुढाकार घेतला आहे. आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी एसबीआय ग्राहकांना ओटीपी द्यावा लागेल, जो त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर येईल. याची पडताळणी केल्यानंतरच त्यांचे पैसे एटीएममधून काढता येतील.

दरम्यान बँकेने “एसबीआय एटीएममधील व्यवहारांसाठी आमची ओटीपी आधारित रोख काढण्याची प्रणाली ही फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध लसीकरण करत आहे. फसवणुकीपासून तुमचे संरक्षण करणे हे नेहमीच आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल.” असे यावेळी बँकेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून या नवीन उपक्रमाची माहिती ग्राहकांना दिली.

स्टेट बँक ऑफ इंडियाने एसबीआय एटीएममधून ओटीपीद्वारे पैसे काढण्याचा अतिशय सोपा मार्ग तयार केला आहे. यावेळी तुम्ही जर एटीएममधून पैसे काढत असाल तर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर चार अंकी OTP पाठवला जाईल. बँकेच्या म्हणण्यानुसार, हा OTP चार अंकी क्रमांक आहे, जो वापरकर्त्याला त्यांच्या व्यवहारासाठी प्रमाणीकृत करतो. एकदा तुम्ही एटीएममध्ये किती पैसे काढू इच्छिता ते प्रविष्ट केल्यानंतर, स्क्रीन आपोआप एक विंडो प्रदर्शित करेल जिथे तुम्हाला तुमचे पैसे प्राप्त करण्यासाठी कोड प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

यात ज्यांच्याकडे SBI ATM कार्ड आहे तेच लोकं या सेवेचा लाभ घेऊ शकतात आणि SBI ATM मधूनच पैसे काढू शकतात. सध्या या सुविधेचा लाभ इतर बँकांच्या एटीएममध्ये मिळणार नाही. तसेच ही व्यवस्था नॅशनल फायनान्शियल स्विच (NFS) मध्ये बांधलेली नाही. बँक मालमत्ता, ठेवी, शाखा, ग्राहक आणि कर्मचारी यांच्या बाबतीत SBI ही देशातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक आहे.

यापूर्वी एसबीआयने ज्येष्ठ नागरिकांना सणासुदीच्या भेटवस्तू दिल्या होत्या. आता SBI च्या विशेष मुदत ठेव योजनेचा लाभ मार्च २०२२ पर्यंत घेता येईल. म्हणजेच या विशेष योजनेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. मे 2020 मध्ये, देशातील सर्वोच्च कर्जदात्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी SBI ‘WECARE’ मुदत ठेव योजना जाहीर केली होती, यापूर्वी SBIने सुरुवातीला सप्टेंबर २०२० ला ही योजना सुरू करण्यात आली होती. परंतु कोविड-१९ महामारीच्या काळात विशेष एफडी योजना अनेक वेळा वाढवण्यात आली. बँकेने पुढील वर्षी मार्च अखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. अलीकडेच बँकेने आपल्या कर्ज विभागातही अनेक ऑफर आणल्या आहेत. ज्यामध्ये गृहकर्जाचे व्याजदर कमी करणे हे मुख्य आहे. या सर्व योजनांचा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची अपेक्षा आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sbi brings new rule on atm withdrawal to protect customers from fraud cash will be withdrawn with help of otp scsm

ताज्या बातम्या