एसबीआयमध्ये ३८५० जागांसाठी भारती, असा करा अर्ज

फ्रेशर्सलाही करता येणार अर्ज, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख आणि इतर तपशील

स्टेस बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयने पदवीधर उमेदवारांसाठी ३८५० पदांसाठी भरतीची जाहिरात जारी केली आहे. सर्कल बेस्ड ऑफिसर म्हणजेच सीबीओ पदासाठी बँकेने अधिसूचना जारी केली आहे. एसबीआयच्या सीबीओ भरती २०२० साठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी १६ ऑगस्ट पूर्वी अर्ज भरुन दाखल करणे बंधनकारक आहे.  ३८५० सीबीओ पदांसाठीही ही भरती म्हणजे बँकेमध्ये नकोरी करण्यासंदर्भातील तयारी करत असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. म्हणजेच फ्रेशर्सही या पदासाठी अर्ज करु शकतात. जाहिरात CRPD/ CBO/ 2020-21/ 20 अंतर्गत दिलेल्या अटींची पूर्तता करणारे उमेदवार या ३८५० पदांसाठी अर्ज करु शकतात. याचसंदर्भातील अटी, निमय आणि महत्वाच्या तारख्यांबरोबरच कुठे किती पदांसाठी भरती होणार आहे हे जाणून घेऊयात.

अर्ज कधी ते कधीपर्यंत भरायचा आहे? : अर्ज भरण्याची तारीख ही २७ जुलै २०२० ते १६ ऑगस्ट २०२० पर्यंत आहे. १६ ऑगस्टनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

एकूण जागा किती आणि कुठे? : ३८५० पदांसाठी ही भरती आहे. त्यापैकी सर्वाधिक जागा या कर्नाटक आणि गुजरातमध्ये आहे. येथे प्रत्येकी ७५० सीबीओ पदांसाठी भरती आहे. त्या खालोखाल तेलंगणामध्ये ५५० जागा आणि मुंबई विभाग वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये ५१७ जागांसाठी भरती होणार आहे. राजस्थानमध्ये ३०० जागांसाठी, मध्य प्रदेशमध्ये २९६ जागांसाठी, छत्तीसगडमध्ये १०४ जागांसाठी, तामिळनाडू ५५ जागा तर गोव्यामध्ये ३३ जागांसाठी भरती होणार आहे.

पात्रता  : या जागांसाठी शैक्षणिक पात्रतेची मर्यादा ही ‘उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापिठामधून कोणत्याही विद्यापिठामधून कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेलं हवं’, अशी आहे.

वयाची अट : १ ऑगस्ट २०२० पर्यंत उमेदवाराचे वय हे ३० वर्षांपेक्षा अधिक असू नये अशीही अट ठेवण्यात आली आहे.

कसा करता येणार अर्ज : इच्छुक उमेदवार एसबीआयच्या वेबसाईटवरुन १६ ऑगस्ट २०२० पर्यंत अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवाराला ईमेलआयडी आणि मोबाइल क्रमांकांबरोबरच इतर माहिती द्यावी लागणार आहे.

एसबीआयच्या भरतीसंदर्भातील अधिक माहिती एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच www.onlinesbi.com वर मिळेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sbi recruitment 2020 notification for 3850 cbo posts scsg

Next Story
पुरुषांमध्येही वाढतेय स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण!
ताज्या बातम्या