SC Allow unmarried women abortion under mtp act | Loksatta

गर्भपातावर सर्वोच्च न्यायालयाचा ‘हा’ मोठा निर्णय, महिलांना मिळणार दिलासा

गर्भवती महिलांबाबत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एमटीपी अर्थात मेडिकल टर्मिनेश ऑफ प्रेग्नेंसी कायद्याअंतर्गत सर्व महिलांना कायदेशीर आणि सुरक्षित गर्भपात करण्याचा अधिकार दिला आहे.

गर्भपातावर सर्वोच्च न्यायालयाचा ‘हा’ मोठा निर्णय, महिलांना मिळणार दिलासा
प्रतिकात्मक छायाचित्र

गर्भवती महिलांबाबत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एमटीपी अर्थात मेडिकल टर्मिनेश ऑफ प्रेग्नेंसी कायद्याअंतर्गत सर्व महिलांना कायदेशीर आणि सुरक्षित गर्भपात करण्याचा अधिकार दिला आहे. तसेच न्यायालयाने विवाहित आणि अविवाहित महिलांसोबत होणारा भेदभाव देखील फेटाळून लावला आहे.

महिलेची वैवाहिक स्थिती ही तिला नको असलेले गर्भ पाडण्याचा तिचा अधिकार हिरावून घेण्याचे कारण असू शकत नाही. लग्न न झालेल्या महिलेला मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेगनेंसी कायदा आणि नियमाअंतर्गत २४ आठवड्यांच्या आत गर्भपात करण्याचा आधिकार आहे, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला.

(या सेलिब्रिटींना आला होत हृदयविकाराचा झटका, आपल्या हृदयाची काळजी घ्या, ‘हे’ करा)

गर्भपात कायद्याअंतर्गत विवाहित आणि अविवाहित महिलेमध्ये भेदभाव करणे हा नैसर्गिक आणि घटनात्मकरित्या योग्य नाही, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली.

एमटीपी कायद्याच्या व्याख्या आणि अविवाहित महिलेला विवाहित महिलेप्रमाणे २४ आठवड्यांच्या आत गर्भपाताचा अधिकार आहे का, या विषयावर न्यायालयात सुनावणी सुरू होती. तेव्हा न्यायमूर्ती डी. वाई चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना यांच्या सयुक्त पीठाने हा निर्णय दिला.

(दीपिका पादुकोणला हृदयाची ‘ही’ समस्या, हृदयगतीमध्ये पडतो फरक)

तसेच पती कडून पत्नीवर होणारे लैगिक अत्याचार हे बलात्काराचे रूप घेऊ शकते. गर्भपात करण्यासाठी एमटीपी कायद्याअंतर्गत बलात्काराच्या अर्थात वैवाहिक बलात्काराला समाविष्ट करणे गरजेचे आहे, असेही सर्वोच्च न्यायालय म्हणाले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Piles Control: मांसाहारामुळे वाढू शकते मूळव्याधची समस्या; जाणून घ्या नियंत्रणासाठी कोणता आहार आहे आवश्यक

संबंधित बातम्या

‘या’ ३ सुक्या मेव्याचे सेवन आयुष्य वाढवेल; फक्त दिवसातून किती खाल्ले पाहिजे ते जाणून घ्या
‘या’ ३ आजारात काजू करू शकतो विषासारखं काम; एका दिवसात किती काजू खाणे योग्य? पाहा तज्ज्ञांचा सल्ला
सावधान! पिझ्झा-बर्गर खाताय, तुम्हाला कर्करोग होऊ शकतो, जाणून घ्या त्यामागचं कारण
करोना काळात कशी घ्याल आपल्या आरोग्याची काळजी? वाचा सहज सोपे उपाय!
मांजरी पाळा पण हेही लक्षात घ्या..

व्हिडिओ

ताज्या बातम्या
बजाओ! भर लग्नमंडपात नवऱ्यासमोरच नवरीचा भन्नाट डान्स, Viral Video पाहून नेटिझन्स म्हणाले, “लग्नात अशीच नवरी…”
Video: “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी…”, ‘त्या’ टीकेनंतर शिंदे गटातील खासदारांचं जाहीर आव्हान!
“गेली अनेक वर्ष…” प्रथमेश परबच्या वाढदिवशी त्याच्या कथित गर्लफ्रेंडने केलेली पोस्ट चर्चेत
FIFA WC 2022: ब्रुनो फर्नांडिसने केलेल्या गोलवर रोनाल्डोचा दावा? Video शेअर करत नेटिझन्सने केले ट्रोल
विश्लेषण : ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट व्हल्गर? IFFI मधील विधानांमुळे पुन्हा फुटलं वादाला तोंड; नेमकं झालं तरी काय?