डास डेंग्यू आणि मलेरिया पसरवतात. त्यांचा याच धोकादायक चाव्याचा उपचारासाठी वापर करण्याचा प्रयोग शास्त्रज्ञांकडून होत आहे. शास्त्रज्ञांनी डासांचा वापर मलेरियाची लस देण्यासाठी केला आहे. यूएस येथील नॅश्नल पब्लिक रेडिओच्या अहवालानुसार, डासांद्वारे लस देण्याची प्रणाली विकसित करणे सुरू आहे. यासाठी २६ सहभागींचा समावेश असलेली छोटी चाचणी युनायटेड किंग्डम येथे होत आहे. या चाचणीचे निष्कर्ष सायन्स ट्रान्सलेशनल मेडिसीनमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

अशी होती प्रक्रिया

या चाचणीत सहभागी झालेल्या कॅरोलिना रीड यांनी आपला अनुभव व्यक्त केला आहे. २०० डास असलेल्या कार्डबोर्ड बॉक्समध्ये आपण हात टाकून ठेवला. डास बाहेर येऊ नये यासाठी त्याला जाळी लागलेली होती. त्यानंतर एका शास्त्रज्ञाने हाताला काळ्या कापडाने झाकले. डासांना रात्री चावा घ्यायला आवडते म्हणून असे करण्यात आले. त्यानंतर माझ्या संपूर्ण हाताला सूज आणि फोडे आल्याचे रीडने सांगितले.

(कर्ज, थकबाकीच्या गर्तेत अडकली व्हीआई कंपनी, उभारीसाठी सीईओची सरकारडे ‘ही’ मागणी)

डासांनी हाणी न पोहोचवणारा परजिवी वाहून नेला

डासांच्या चाव्याच्या माध्यमातून मलेरियाची लस देण्यासाठी परजिवीमध्ये अनुवांशिक बदल घडवणे शास्त्रज्ञांना शक्य झाले आहे. लोकांना आजारी करणार नाही असा अनुवांशिक बदल घडवलेला मलेरिया फैलवणारा प्लास्मोडियम परजिवी वाहून नेण्याचे कार्य डासांनी केले आहे. शास्त्रज्ञांनी यापूर्वी असा प्रयत्न केला आहे. पहिल्यांदाच हा प्रयोग पूर्ण करण्यासाठी ‘क्लस्टर्ड रेग्युलर्ली इंटरस्पेस्ड शॉर्ट पालिंड्रोमिक रिपीट’ चा वापर करण्यात आला आहे, असे अभ्यास पत्राचे प्रमुख लेखक, वाशिंग्टन विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. सिएन मर्फी यांनी सांगितले.

प्रयोग किती परिणामकारक?

अनुवांशिक सुधार करण्यात आलेल्या परजिवींनी काही सहभागींना मलेरियाच्या संसर्गापासून काही महिन्यांपर्यत संरक्षण दिल्याचे चाचणीमध्ये दिसून आले आहे. मात्र त्याची परिणामकारकता ही प्रयोगातील सर्वात महत्वाचा बाब होती. निकालानुसार, सुधारित परजिवी देण्यात आलेल्या २६ पैकी १४ सहभागींना मलेरियाची लागण झाली. यातून डासांद्वारे लस देण्याचा हा प्रयोग केवळ ५० टक्केच परिणामकारक असल्याचे समोर आले आहे.

(लावाने लाँच केला सर्वात स्वस्त ‘मेड इन इंडिया’ ५ जी फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर)

अनुवांशिकरित्या सुधार केलेल्या डासांना सोडण्याचा शास्त्रज्ञांचा हेतू नाही. त्याऐवजी, शास्त्रज्ञांना अधिक नियंत्रित पद्धतीने डासांचा वापर लस देण्यासाठी करायचा आहे. या प्रयोगाचे मेरिलँड स्कुल ऑफ मेडिसीन विद्यापीठाच्या डॉ. क्रिस्टेन लायके यांनी कौतुक केले आहे. औषधी निर्मितीसाठी अनुवाशिकरित्या सुधार केलेल्या लाइव्ह परजिवीचा वापर करणे ही मोठी बाब असल्याचे त्या म्हणाल्या.

हा प्रयोग पुढे जगातील पहिल्या मलेरियाच्या लसीपेक्षा अधिक परिणामकारक लस देऊ शकेल, असा विश्वास डॉ. मर्फी यांनी व्यक्त केला आहे. औषध निर्माता ग्लाक्सो स्मित क्लाईनद्वारे निर्मित आरटी एस ही जगातील पहिली मलेरियावरील लस आहे. मात्र तिची परिणामकारकता केवळ ३० ते ४० टक्के असल्याचे मर्फी यांनी सांगितले.