जनुकांचे संपादन करण्याचे तंत्र वापरून वयपरत्वे होणारा रोग प्रौढ प्राण्यांमध्ये बरा करण्यात यश आले असून, या तंत्रात डीएनएच्या डेटाबेसमध्ये अगदी बारीक, पण अचूक बदल केले जातात. यकृताचा आजार असलेल्या एका उंदरावर ‘क्रिस्प्र’ नावाचे जनुकीय संपादन तंत्र वापरून प्राणी व वनस्पती यांच्यात अगदी जनुकीय अक्षरे बदलता येतात. यकृताच्या चयापचायाच्या क्रियेत महत्त्वाच्या जनुकाचे उत्परिवर्तन झाल्याने रोग होतो, पण ते उत्परिवर्तन संपादित करून जनुकीय दोष दूर करणे शक्य झाले आहे.
येत्या काही वर्षांत मानवातही जनुकीय संपादन करून रोग बरे करणे शक्य होणार आहे. क्रिस्प्र या तंत्राने कुठल्याही डीएनएत बदल घडवून आणता येतात. प्राणी व वनस्पती यांच्यातील गुणसूत्रावर असलेल्या विशिष्ट िबदूंमध्ये बदल घडवता येतात. क्रिस्प्र याचा खरा उच्चार क्रिस्पर असा असून हे तंत्र १९८७ मध्ये प्रतिकारशक्ती संरक्षणाचा एक भाग म्हणून आक्रमक विषाणूंच्या विरोधात शोधून काढण्यात आले.
‘कॅस ९’
 २०१२ व २०१३ मध्ये  वैज्ञानिकांनी ‘कॅस ९’ या विकराचा वापर डीएनएस स्नायिपगसाठी करता येतो व त्याच्या मदतीने मानवी जनुकात बदल करता येतात हे दाखवून दिले होते. तेव्हापासून जनुक संपादनाबाबत आशा पल्लवित झाल्या होत्या.
मानवी जनुकीय आराखडय़ातील साधी अक्षरे बदलूनही हवा तो परिणाम साध्य करता येऊ लागला. मानवी डीएनए रेणूत जनुकांच्या ३ अब्ज मूळ जोड्या असतात व त्यातील एक चूक दुरूस्त करणे म्हणजे २३ खंडांच्या एनसायक्लोपीडियात बदल करण्यासारखे असते.
खास आहाराच्या मदतीने बदल
आताच्या संशोधनात मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील वैज्ञानिकांनी क्रिस्पर तंत्र वापरून यकृतातील उत्परिवíतत जनुक एलएएच घेऊन त्याच्यावर विशिष्ट औषधे व खास आहाराच्या मदतीने बदल करता येतो हे दाखवून दिले. या जनुकामुळे अमायनो अॅसिडची थायरोसिन ही मालिकाच तयार होते. वैज्ञानिकांनी उंदराच्या यकृतातील एक तृतीयांश पेशी दुरूस्त केल्या. अतिदाबाच्या इंजेक्शनने या दुरूस्त्या केल्या जातात.

‘क्रिस्पर तंत्र हे खूप प्रगत आहे कारण प्रौढ जनुकीय दोष यातून दूर करता येतात, पण हे तंत्र प्रत्यक्ष मानवात वापरता येण्यासाठी त्यात अनेक अडथळे दूर करावे लागतील. तरीदेखील, हे तंत्र काम करते हे सिद्ध झाले हीच मोठी गोष्ट आहे. या पद्धतीत येत्या एक-दोन वर्षांत त्यात उपचारांच्या दृष्टीने मोठी प्रगती होईल व इतर प्रत्यक्ष उपचारही शक्य होतील.’
बर्कले येथील कॅलिफोíनया विद्यापीठातील संशोधक जेनिफर दाउदना

‘क्रिस्पर पद्धती  प्राण्यांमधील जनुकीय आजार दूर करण्यासाठी वापरता येते, मानवातही ती वापरता येईल. यकृताचा हा रोग जनुकातील एका उत्परिवर्तनाने होत असतो पण त्यात दुरूस्ती केल्यास तो रोग बरा होतो.जिवंत प्रौढ प्राण्यात आपण बिघडलेला जनुक दुरूस्त करू शकतो ही या तंत्रज्ञानाची गंमत आहे.’
एमआयटीचे प्रा. डॅनियस अँडरसन