Secret santa in budget: जेव्हा ख्रिसमस येतो तेव्हा ऑफिसमध्ये एक वेगळाच उत्साह असतो. तिथे सजावट असते, आणि सर्वांत मजेदार गोष्ट म्हणजे सीक्रेट सांता. पण मजा तेव्हाच असते, जेव्हा भेटवस्तू खास, उपयोगी आणि बजेटमध्ये बसणारी असते. ‘काय द्यावं’ हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. महाग नको; पण साधंही नको, अशीच सगळ्यांची अपेक्षा असते. म्हणूनच या ख्रिसमस २०२५ साठी आम्ही तुमच्यासाठी काही भन्नाट, परवडणाऱ्या आणि ऑफिसमधल्यांनाही देता येतील अशा गिफ्टच्या आयडिया घेऊन आलो आहोत. या भेटवस्तू तुमच्या ऑफिसमधल्यांचा दिवस नक्कीच खास बनवतील.

परवडणाऱ्या सीक्रेट सांता गिफ्ट कल्पना

१. ६०० मिली कॅप ग्लो बॉटल
ऑफिसमध्ये व्यग्र असताना पाणी पिण्यास विसरणाऱ्यांसाठी ही बाटली कामी येऊ शकते. ही बाटली अंधारात चमकते आणि त्यांना पाणी पिण्याची आठवण करून देते. एका हाताने चग लिड, सायलेंट रिमाइंडर मोड व यूएसबी चार्जिंग ही या बाटलीची खास वैशिष्ट्ये आहेत. बीपीए-मुक्त आणि डिशवॉशर-सुरक्षित असल्याने, ही बाटली दररोज वापरण्यासाठी योग्य आहे. ही एक अशी भेट आहे, जी मदतही करते आणि स्टायलिशही वाटते.

Award Banner

२. डियर क्रिस्टल ग्लोब लॅम्प (One94Store 3D)
डेस्क किंवा घर सजवायला काहीतरी वेगळं हवं असेल, तर हा 3D क्रिस्टल ग्लोब लॅम्प उत्तम पर्याय आहे. या लॅम्पमध्ये हरण, चंद्र आणि आकाशगंगेचे सुंदर 3D लेसर कोरीव काम केलेले आहे. मऊ आणि डोळ्यांना आराम देणारा प्रकाश रात्रीसाठी अगदी योग्य आहे. लाकडी बेस आणि यूएसबी कनेक्शनमुळे हा लॅम्प ऑफिस किंवा घर दोन्ही ठिकाणी शोभून दिसतो.

३. कॉफी मग(NYRWANA)
कॉफी किंवा चहाशिवाय ऑफिसचा दिवस सुरूच होत नाही, अशांसाठी हा सिरॅमिक कॉफी मग एक उपयोगी गिफ्ट आहे. ३८० मिली क्षमतेचा, मायक्रोवेव्ह-सेफ आणि मजबूत बनावटीचा हा मग रोजच्या वापरासाठी योग्य आहे. त्यासोबत झाकण आणि चमचा मिळत असल्यामुळे तो अधिकच खास वाटतो. ख्रिसमस डेकोरमध्ये शोभेल असा लाल रंग याला अजून आकर्षक बनवतो.

४. पर्सनलाइज्ड 3D नेम लॅम्प
नावासह मिळणारा नेम लॅम्प ही एक ट्रेंडी आणि लक्षात राहणारी भेट आहे. ऑफिस डेस्क किंवा घरात बेडरूम किंवा लिव्हिंग रूमसाठी हा लॅम्प उठून दिसेल. याला कमी वीज लागते, सौम्य प्रकाश देते आणि यूएसबी पॉवर सपोर्ट ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. सीक्रेट सांता, नवीन वर्ष किंवा कॉर्पोरेट गिफ्टसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

५. प्रिंटेड ख्रिसमस मग, कोस्टर्स, गिफ्ट बॉक्स सेट
पर्यावरणाची काळजी घेणाऱ्यांसाठी हा इको-फ्रेंडली गिफ्ट सेट खास आहे. हा सेट तांदळाच्या टरफलांपासून बनवलेला असल्यामुळे तो हलका, टिकाऊ व पर्यावरणपूरक आहे. फूड-सेफ, मायक्रोवेव्ह आणि डिशवॉशर-सेफ असल्यामुळे रोजच्या वापरासाठी तो योग्य आहे. ख्रिसमसचा फील देणारा हा संपूर्ण गिफ्ट हॅम्पर सीक्रेट सांतासाठी एकदम परफेक्ट ठरतो.

सीक्रेट सांता म्हणजे फक्त भेटवस्तू नाही, तर त्यामागची भावना महत्त्वाची असते. परवडणारी, उपयोगी आणि थोडीशी वेगळी भेट दिली, तर तुमचा सहकारी नक्कीच आनंदी होईल. तेव्हा या ख्रिसमस २०२५ ला तुमचं गिफ्ट अनेकांच्या आठवणीत राहील असंच काहीतरी निवडा.