How To Wake Up Early In The Morning:  सकाळी लवकर उठणं आरोग्यासाठी किती फायदेशीर असतं हे सर्वांनाच माहिती आहे. तुमच्या माहितीसाठी ब्रह्म मुहूर्त पहाटे ४.३० ते ५.३० च्या दरम्यान असतो. आरोग्यतज्ज्ञदेखील या वेळेत उठण्याचा सल्ला देतात. बरेच लोक लवकर उठण्याचा प्रयत्न करतात, पण अनेकदा ते शक्य होत नाही. पण, आज तुम्हाला सकाळी लवकर उठवण्यासाठी रात्री किती वाजता झोपावं लागेल ते सांगणार आहोत.

सकाळी लवकर उठण्यासाठी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

१) झोपण्याची वेळ निश्चित करा

जर तुम्हाला ब्रह्म मुहूर्तावर म्हणजे सकाळी ५:३० वाजता उठायचे असेल तर तुम्ही रात्री ९:३० वाजता झोपायला हवे. कमीत कमी ७ तास झोपेचे लक्ष्य ठेवा. तुम्हाला कितीही वाजता उठायचे असेल तरी ७ तास झोप पूर्ण होईल हे निश्चित करा. दररोज त्याच वेळी झोपण्याची सवय लावा, यामुळे तुम्हाला सकाळी त्याच वेळी उठण्यास मदत होईल.

२) लक्षात ठेवण्याची महत्त्वाची गोष्ट

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोपण्याच्या सुमारे एक तास आधी तुमचा फोन किंवा टीव्ही/लॅपटॉप वापरणे थांबवा. झोपताना स्क्रीन वापरणे झोपेसाठी धोकादायक ठरू शकते. याव्यतिरिक्त तुम्ही झोपेच्या सुमारे २ ते ३ तास ​​आधी रात्रीचे जेवण करावे. गाढ झोपेसाठी रात्री हलके जेवण खाणे उचित आहे.

३) एका आठवड्यात ही सवय होईल

एका आठवड्यासाठी दररोज या छोट्या टिप्स फॉलो करा. फक्त एका आठवड्यात तुम्हाला आपोआप सकारात्मक परिणाम जाणवू लागतील. याशिवाय तुम्ही सकाळी लवकर उठण्यासाठी पिलो टेक्निकचा वापरदेखील करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या उशीला स्पर्श करा आणि तीन वेळा ठामपणे म्हणा, ‘मी उद्या सकाळी अगदी ताजेतवाने उठेन’ या टेक्निकमुळे तुम्ही फ्रेश उठाल.