right way to eat 7 seeds : बिया आकाराने लहान असल्या तरी त्या कशा तयार केल्या जातात आणि कशा खाल्ल्या जातात, यामुळे त्या आहारात किती योग्य ठरतील यावर फरक पडू शकतो. काही बिया खाण्यापूर्वी भिजवणे, तर काही भाजून किंवा बारीक करून खाणे योग्य ठरते. त्यामुळे आहारात बियांचा समावेश करण्यापूर्वी खाण्याची योग्य पद्धत जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
याबद्दल आर्टेमिस हॉस्पिटल्स, गुरुग्राम येथील सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, डॉक्टर वर्तिका विश्वानी यांनी माहिती दिली आहे. यामध्ये त्या कशा तयार कराव्यात, किती प्रमाणात खाव्यात आणि केव्हा खाव्यात आणि प्रत्येक बियाचा मुख्य फायदा काय असतो याबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे त्यांच्या सल्ल्यानुसार, या सातही बिया दररोज खाणे आवश्यक नाही.
‘या’ ७ बिया कशा खाव्यात?
चिया सीड्स (Chia seeds)
चिया सीड्स फायबरने (तंतुमय पदार्थांनी) समृद्ध असतात; जे पचन आणि आतड्यांच्या आरोग्यास मदत करतात. पाण्यात किंवा दुधात किमान २० मिनिटे भिजवून ठेवा आणि सकाळ किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा नाश्त्याबरोबर १ मोठा चमचा खाणे पुरेसे आहे.
भोपळ्याच्या बिया (Pumpkin seeds)
कच्च्या किंवा मंद आचेवर ३ ते ४ मिनिटे भाजून तुम्ही खाऊ शकता. सेवन करताना त्याचे प्रमाण एक लहान मूठभर, अंदाजे २८ ग्रॅम असावे. तुम्ही नाश्त्यामध्ये किंवा सॅलड आणि दह्यावर घालून खाऊ शकता. मूठभर बिया खाल्ल्याने शरीराला दररोज आवश्यक असलेल्या मॅग्नेशियमपैकी सुमारे ३७ टक्के मिळू शकते.
हालीम बिया
हालीम बिया लोहाचा (Iron) चांगला वनस्पतीजन्य स्रोत मानल्या जातात. त्या आहारात समाविष्ट करण्यासाठी आधी साधारण २ तास पाण्यात भिजवून घ्याव्यात. त्यानंतर त्या पाण्यात, दह्यात किंवा स्मूदीमध्ये मिसळून खाऊ शकता. दररोज दुपारी किंवा रात्री जेवणाबरोबर तुम्ही १ ते २ चमचे खाऊ शकता. लोहाचे शोषण चांगले व्हावे यासाठी बिया लिंबाबरोबर घेण्याचा सल्ला दिला जातो. लिंबातील व्हिटॅमिन C शरीराला लोह शोषून घेण्यास मदत करू शकते.
तीळ
तीळामधून कॅल्शियमसोबत शरीराला आरोग्यदायी चरबी आणि आवश्यक खनिजे मिळतात. खाण्यापूर्वी हलके भाजून घ्या, नंतर कोणत्या पदार्थात घालण्यापूर्वी कुटून किंवा दळून घ्या. दिवसातून १ मोठा चमचा सेवन पुरेसे आहे. तुम्ही तीळ चटणी, सॅलड, भाज्याबरोबर किंवा पोळीच्या पिठात मिक्स करून खाऊ शकता.
जवस
जवसएएलए (ALA) ने समृद्ध, जवनस्पती-आधारित ओमेगा-३ फॅटी ऍसिड आहे. अख्खे कच्चे जवस पचनसंस्थेतून पूर्णपणे न पचता बाहेर पडू शकते, त्यामुळे नेहमी जवस हलके भाजून दळूनच खावे. दिवसातून १ मोठा नाश्ता करताना दह्यात, स्मूदीमध्ये किंवा पिठात मिसळून तुम्ही खाऊ शकता.
सूर्यफुलाच्या बिया
सूर्यफुलाच्या बिया व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. हे घटक शरीरातील पेशींना ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून वाचवण्यास मदत करतात. त्यामुळे सेवन करताना कच्च्या किंवा हलक्या भाजलेल्या सूर्यफुलाच्या बिया निवडा आणि अतिरिक्त मीठ घालू नका. नाश्ता म्हणून किंवा ओट्स, सॅलड आणि दह्यात मिसळून खावे. त्यामुळे तुम्ही दिवसातून १ ते २ मोठे चमचे याचे सेवन करू शकता.
खसखस
खसखस कॅल्शियम आणि मॅंगनीजचा स्रोत आहे. डॉक्टरांच्या मते, खसखस हलके भाजून आणि नंतर दळून पदार्थात घालणे सर्वोत्तम आहे.तुम्ही चमचाभर खसखस आमटी, ग्रेव्ही किंवा घरी बनवलेल्या चटण्यांमध्ये मिक्स करून खाऊ शकता.
तुम्हाला दररोज सर्व ७ प्रकारच्या बियांची गरज आहे का?
अजिबात नाही.
डॉक्टर म्हणतात की, दररोज प्रत्येक प्रकारच्या बिया खाण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, एक किंवा दोन प्रकार निवडावेत आणि आठवडाभर ते आलटून पालटून खावेत. बिया पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात, त्यामुळे जास्त खाणे नेहमीच चांगले नसते. ज्या लोकांच्या आहारात सध्या फायबरचे प्रमाण कमी आहे, त्यांना त्या कमी प्रमाणात सुरुवात करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. बिया खाण्यासाठी योग्य वेळ शोधण्याची गरज नाही. डॉक्टरांच्या मते, बिया खाण्यासाठी अशी कोणतीही ‘जादुई वेळ’ नसते. त्या योग्य पद्धतीने तयार करणे, योग्य प्रमाणात खाणे आणि त्यांचा पोत लक्षात घेणे अधिक महत्त्वाचे आहे.
