Sendha Namak vs White Salt: मीठ आपल्या आहाराचा एक अविभाज्य घटक आहे. असं असलं तरीही आजकाल हाय ब्लड प्रेशरसारख्या आरोग्य समस्या अनेकांना सतावतात. त्यामुळे डॉक्टर मीठाचे सेवन मर्यादित ठेवण्याचा सल्ला देतात. परिणामी अनेक जण मीठाला पर्याय शोधतात. सोशल मीडियावर किंवा अनेक जणांचा असा समज आहे की, साध्या मीठापेक्षा सैंधव मीठ चांगले असते. त्याचा रोजच्या आहारात समावेश केल्याने शरीराला कोणतीही होनी होत नाही. काही जण असाही दावा करतात की, सैंधव मीठ हानिकारक आहे. या दोन प्रकारच्या मीठापैकी कोणते खावे, हा अनेकदा संभ्रमाचा विषय असतो. तज्ज्ञ डॉ. विपुल यांनी इंस्टाग्राम पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

सैंधव मीठ पांढऱ्या मीठापेक्षा चांगले आहे का?

अनेकांचा असा विश्वास आहे की, सैंधव मीठ साध्या पांढऱ्या मीठापेक्षा चांगले असते. रोजच्या जेवणात वापरल्यास शरीराला कोणतेही नुकसान पोहोचवत नाही. तज्ज्ञांच्या मते, सोशल मीडियामुळे अनेक लोकांच्या मनात हा गैरसमज होतो की, सैंधव मीठ पांढऱ्या मीठापेक्षा चांगले का नाही हे समजून घेण्यासाठी तीन गोष्टी समजून घेणे महत्त्वाचे आहे.

सैंधव मीठात आयोडिन नसते

तज्ज्ञ सांगतात की, सामान्य पांढरे मीठ शुद्ध केलेले असते आणि त्यात आयोडिन असते. हे आयोडिन तुमच्या थायरॉईड आणि मेंदूच्या विकासासाठी आवश्यक आहे. याउलट सैंधव मीठात आयोडिन नसते. लहान मुले आणि गरोदर महिलांसाठी आयोडिन अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र सैंधव मीठातून ते मिळत नाही.

जेवणात सैंधव मीठाचा वापर गरजेपेक्षा जास्त केला जातो

डॉक्टरांच्या मते, दोन्ही प्रकारच्या मीठांमध्ये सोडियम क्लोराईड हे एकच मूळ संयुग असते. मात्र सैंधव मीठात क्षारांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे ते अन्नात थोडे जास्त प्रमाणात घातले जाते. यामुळे एकूण सोडियमचे सेवन वाढते. म्हणूनच साध्या मीठापेक्षा सैंधव मीठामुळे अनेकदा जास्त सोडियमचे सेवन होते.

सैंधव मीठात अतिरिक्त खनिजे असतात का?

सैंधव मीठात अतिरिक्त खनिजे असतात, त्यामुळे ते साध्या मीठापेक्षा अधिक फायदेशीर ठरते असा समज आहे. तज्ज्ञ सांगतात की, हो खरं आहे. सैंधव मीठात काही अतिरिक्त खनिजे असतात कारण ते शुद्ध केलेले नसते. असं असलं तरी, हे समजूण घेणं महत्त्वाचं आहे की, ही खनिजे इतक्या प्रमाणात असतात की त्यामुळे कोणतेही मोठे फायदे मिळत नाहीत.

मीठाच्या सेवनाबाबत महत्त्वाच्या गोष्टी

रोजच्या आहारात फक्त पांढरे मीठ वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. पण त्याचे प्रमाण मर्यादित ठेवणे महत्त्वाचे आहे. लोणचे, चटण्या, सांबार आणि टिकवलेले पदार्थ यांसारखे जास्त मीठ असलेले पदार्थ टाळणे योग्य आहे.