WhatsApp वर Sexting होणार सुरक्षित? ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

व्हॉट्सअ‍ॅपचं हे नवं फिचर हे स्पष्ट संकेत आहेत की व्हॉट्सअ‍ॅप हे स्नॅपचॅटशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करत आहे.

Sexting on WhatsApp will be safe Take care of these things gst 97
WhatsApp वर Sexting होणार सुरक्षित! 'या' गोष्टींची घ्या काळजी

आता एक नवीन ‘सेक्सटिंग’ (Sexting) अ‍ॅप आलं आहे. हे अ‍ॅप आहे व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp). आश्चर्य वाटलं ना? पण हे खरंय व्हॉट्सअ‍ॅपने अधिकृतपणे ‘व्ह्यू वन्स’ (View Once) फीचरची घोषणा केली आहे. त्यामार्फत युझर्स काही वेळात डिसॅपिअर होणारे फोटो आणि व्हिडिओ पाठवू शकतील. व्हॉट्सअ‍ॅपचं म्हणणं आहे की हे नवीन फीचर डिसॅपिअर होणाऱ्या मीडियासह युझर्सना अधिक प्रायव्हसी कंट्रोल देण्याविषयी आहे. पण याचाच वेगळा अर्थ लक्षात घ्या. व्हॉट्सअ‍ॅपचं हे नवं फिचर हे स्पष्ट संकेत आहेत की व्हॉट्सअ‍ॅप हे स्नॅपचॅटशी (Snapchat) स्पर्धा करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण स्नॅपचॅट हे एक असं अ‍ॅप आहे जे सेक्सटिंगसाठी मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं.

काय आहे व्हॉट्सअ‍ॅपचं ‘व्ह्यू वन्स’ फिचर?

आपण असं गृहीत धरू शकतो की, व्हॉट्सअ‍ॅपचं ‘व्ह्यू वन्स’ हे फीचर सेक्सटिंगसाठी वापरलं जाणार आहे. विशेषत: भारतासारख्या देशात जिथे जवळजवळ प्रत्येकाकडे एकवेळ स्नॅपचॅट नसेल पण व्हॉट्सअ‍ॅप आहेच. दरम्यान हे जरी खरं असलं कि तरी आम्ही तुम्हाला आता जे सांगणार आहोत ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे. व्हॉट्सअ‍ॅपचं हे व्ह्यू वन्स फीचर प्रत्यक्षात असुरक्षित आहे. जाणून घेऊया कि असं नेमकं का? आणि हे फिचर कसं काम करतं.

व्हॉट्सअ‍ॅपचं हे फिचर युझर्ससाठी उपलब्ध झाल्यानंतर ते असे फोटोज पाठवू शकतील जे पाहिल्यानंतर काही वेळात डिसॅपिअर होतात. तसेच हे फोटो आणि व्हिडिओ फोन गॅलरी अ‍ॅपमध्ये देखील सेव्ह केले जाणार नाहीत. व्ह्यू वन्स फीचरच्या मदतीने एकदा तो फोटो किंवा व्हिडिओ युझरने पहिला आणि तो डिसॅपिअर झाला कि चॅटमध्ये त्याच्या जागी ‘Opened’ असं लिहिलेलं दिसेल. सध्या कोणत्याही व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधील एखादा मेसेज डिलीट केल्यानंतर त्या मेसेजच्या जागी जसं ‘Deleted’ “दिसतं अगदी तसंच. त्याचप्रमाणे, जर या फीचरमार्फत पाठवलेले फोटोज किंवा व्हिडीओज १४ दिवसांपर्यंत पाहिले नाहीत तर ते एक्सपायर होतील.

WhatsApp वर Sexting किती सुरक्षित?

आपल्याला कोणाला काही खाजगी पाठवायचं असेल तर व्हाट्सअ‍ॅपच्या व्ह्यू वन्समार्फत पाठवण्यात आलेले मेसेज अधिक सुरक्षित असतील हे अगदीच नाकारता येत नाही. कारणव्हाट्सअ‍ॅपचं असं म्हणणं आहे कि, हे फोटो किंवा व्हिडिओ एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असणार आहेत. उदाहरणार्थ, आपण आपला कार्ड पिन किंवा एखाद्या पत्त्याचा फोटो किंवा आणखी काही खाजगी गोष्टी या पद्धतीने शेअर करू शकता. त्याचसोबत, हे फोटो सेव्ह होत नसल्याने लोकांना त्यांच्या फोनमधील स्टोरेज वाचवण्यात देखील मदत होऊ शकते.

दरम्यान आपण जर नीट लक्षात घेत तर व्हॉट्सअ‍ॅप सेक्सटिंगचं हे फिचर थोडंसं ट्रिकी किंवा काहीसं असुरक्षित देखील आहे. याची कारणं जाणून घेऊया. पहिलं म्हणजे ह्यात स्क्रीनशॉटची परवानगी नाकारणारं फिचर नाही. तुम्ही तुमचा एखादा अत्यंत खाजगी फोटो कोणाला पाठवला तर ह्याची शाश्वती नाही ते त्याचा स्क्रीनशॉट काढणार नाहीत. त्यामुळे ही मोठी जोखीम आहे. याउलट स्नॅपचॅटवर मात्र स्क्रिनशॉट घेतला जात असेल तर ज्याने मेसेज पाठवला आहे त्याला एक अलर्ट मिळतो. अर्थात हे स्क्रीनशॉट किंवा स्क्रीन-रेकॉर्डिंग अलर्ट अगदीच परिपूर्ण असतील असं नाही. पण अन्य अ‍ॅप्समध्ये किमान ते आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये हा पर्यायच नाही. त्यामुळे, यावर स्क्रिनशॉट किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग होऊ शकतं.

असे अनेक थर्ड पार्टी अ‍ॅप्स आहेत जे गुप्त पद्धतीने हे काम करतात. त्यामुळे, व्हॉट्सअ‍ॅपवर ‘व्ह्यू वन्स’सारखं हे फिचर खूप इंटरेस्टिंग वाटत असलं तरी याचा निर्णय घेण्यापूर्वी एकदा विचार करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sexting on whatsapp will be safe take care of these things gst

Next Story
पुरुषांमध्येही वाढतेय स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण!
ताज्या बातम्या