Shah Rukh Khan Fitness: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान २ नोव्हेंबर रोजी आपला ६१ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याचा फिटनेस आणि दमदार अभिनय पाहून तो ६१ वर्षांचे आहे, यावर विश्वास बसत नाही. ज्या वयात अनेक जण आराम करण्याचा विचार करतात, त्या वयात शाहरुखचा किंग हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

आजही चाहते त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक असतात. त्याच्यासारखी फिट बॉडी असावी, अशी अनेकांची इच्छा असते. प्रत्येक चित्रपटासाठी शाहरुख खूप मेहनत घेतो आणि त्यानुसार शरीर तंदुरुस्त ठेवतो. मात्र काही सवयी अशा आहेत, ज्या तो कधीच सोडत नाहीत. तो नियमित व्यायाम करतो आणि काही पदार्थ त्याने आहारातून पूर्णपणे वगळले आहेत. जाणून घेऊया किंग खानचं फिटनेस रूटीन.

रोज नियमित व्यायाम

शाहरुख खान आपल्या दिनचर्येबाबत खूप शिस्त पाळतो. तो दररोज व्यायाम करतो. कधी शूटिंग उशिरा संपलं तरी त्यानंतर जवळपास एक तास व्यायाम करतो. त्याच्या घरीच जिम आहे. तो रोज वेट ट्रेनिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करतो. याशिवाय दररोज वेगवेगळा व्यायामही करतो. ट्रेनरच्या सल्ल्यानुसार तो व्यायाम करतो आणि एखाद्या खास भूमिकेसाठी वेगळी मेहनतही घेतो.

शारीरिक फिटनेससोबत मानसिक आरोग्यही महत्त्वाचे

शाहरुख खानचे मत आहे की, फक्त शरीर तंदुरुस्त असणे पुरेसे नाही. निरोगी राहण्यासाठी मानसिक आरोग्यही चांगले असणे गरजेचे आहे. शरीर फिट असले तरी मन आनंदी नसेल, तर त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे फिटनेससोबत मानसिक शांततेलाही महत्त्व द्यायला हवे.

साधे घरचे जेवणच आवडते

शाहरुख खानला फॅन्सी पदार्थ खाण्याची आवड नाही. तो साधं घरचं जेवण पसंत करतो. त्याच्या रोजच्या आहारात ग्रिल्ड चिकन, मोड आलेली कडधान्ये, ब्रोकली आणि थोडी डाळ असते. तो दिवसातून फक्त दोन वेळा जेवतो दुपारचं आणि रात्रीचं. मध्ये मध्ये काही खाणं त्यांना आवडत नाही. भूक लागली तर ते फळे खातात.

‘हे’ ३ पांढरे पदार्थ ठेवा दूर

शाहरुख खान भात, साखर आणि पांढरा ब्रेड खात नाहीत. त्यांच्या मते, शरीरासाठी हानिकारक असलेल्या गोष्टी टाळणेच योग्य आहे. या तीन पांढऱ्या पदार्थांमुळे शरीरातील चरबी आणि साखरेचे प्रमाण वाढू शकते. याशिवाय ते कोणत्याही प्रकारची मिठाई खात नाहीत. जंक फूडपासून दूर राहतात आणि मद्यपानही करत नाहीत.

शिस्तच यश मिळवून देते

शाहरुख खान यांचे म्हणणे आहे की, शिस्त माणसाला अधिक चांगले बनवते. आयुष्यात कोणतेही ध्येय गाठायचे असेल, तर सातत्याने मेहनत करणे आवश्यक आहे. फिट शरीर हवे असेल, तर रोज नियमित मेहनत करावी लागते.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)