Shani Rashi Parivartan: २०२२ मध्ये शनी ग्रह बदलणार पुढील राशी, जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांवर असणार शनीची नजर

सर्व नऊ ग्रहांमध्ये शनी हा ग्रह सर्वात महत्वाचा मानला जातो. कर्माचा दाता शनी देव माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. आता पुढील राशी परिवर्तन २९ एप्रिल २०२२ रोजी शनी ग्रहाद्वारे होणार आहे. जाणून घ्या, कोणत्या राशीच्या व्यक्तींवर असणार शनीची तिरकी नजर?

shani-rashi-parivartan-2022

सर्व नऊ ग्रहांमध्ये शनी हा ग्रह सर्वात महत्वाचा मानला जातो. कर्माचा दाता शनी देव माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. सर्व नऊ ग्रहांमध्ये शनी सर्वात कमी गतीने चालतो, त्यामुळे शनी ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात. आता पुढील राशी परिवर्तन २९ एप्रिल २०२२ रोजी शनी ग्रहाद्वारे होणार आहे. या काळात शनी मकर राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश करेल. शनीचा कुंभ राशीत प्रवेश जवळपास ३० वर्षांनी होणार आहे.

या राशींवर शनी साडेसती आणि धैय्या सुरू होतील : शनीच्या राशी बदलामुळे मीन राशीच्या लोकांवर शनी साडेसती सुरू होईल, त्यानंतर कर्क आणि वृश्चिक राशींवर धैय्या सुरू होतील. शनीच्या राशी बदलामुळे मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांना शनिधाऱ्यापासून मुक्ती मिळेल. दुसरीकडे धनु राशीच्या लोकांची साडेसातीपासून सुटका होईल.

आणखी वाचा : Venus Transit 2021: मकर राशीत प्रवेश करणार शुक्र, या ५ राशींच्या लोकांना होणार धनलाभ

या राशींवर शनीची वाकडी नजर असेल: २९ एप्रिलनंतर, १२ जुलै २०२२ रोजी शनी ग्रह पुन्हा एकदा राशी बदलेल आणि तो प्रतिगामी अवस्थेत मकर राशीत प्रवेश करेल. त्यानंतर १७ जानेवारी २०२३ पर्यंत शनी मकर राशीत राहील. मकर राशीत शनीच्या प्रवेशाने धनु राशीच्या लोकांवर पुन्हा एकदा साडेसाती सुरू होईल, तर मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांवर धैयाचा प्रभाव राहील. अशा प्रकारे पाहिल्यास धनु, मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांना शनीच्या दशातून २०२३ मध्येच पूर्ण मुक्ती मिळेल.

आणखी वाचा : Vastu Tips : लग्न उशीरा होण्याचं कारण असू शकतं वास्तुदोष, या उपायांनी दोष दूर करा

शनी साडेसातीचे तीन चरण आहेत. पहिल्या टप्प्याला उदय टप्पा म्हणतात, या टप्प्यात मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो. दुसऱ्या टप्प्याला शिखर टप्पा म्हणतात, ज्यामध्ये शनी साडेसाती शिखरावर आहे. ज्योतिष शास्त्रानुसार शनी साडेसातीची ही सर्वात वेदनादायक अवस्था मानली जाते.

आणखी वाचा : Corona : तुमच्या मुलांना सुद्धा सुई लावून घेताना भीती वाटते का? त्यांना कसं करायचं तयार? जाणून घ्या

त्याच वेळी, तिसऱ्या टप्प्याला अस्त फेज म्हणतात. यामध्ये शनीचा अशुभ प्रभाव कमी होऊ लागतो. असे मानले जाते की या चरणात शनी व्यक्तीला त्याची चूक सुधारण्याची संधी देतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shani rashi parivartan 2022 in the year 2022 these zodiac signs will have saturns vision sade sati and saturn dashas effect shani transit in 2022 know what zodiac sign will get affected prp

Next Story
‘या’ ४ राशीच्या मुली आहेत खूप हुशार, कमी वेळात बनतात सगळ्यांच्या बॉस
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी