Shardiya Navratri 2022: While Recite Durga Saptashati, Take special care of 'these' things; Will get Expected benefits | Loksatta

Shardiya Navratri 2022: नवरात्रीला दुर्गा सप्तशतीचे पठण घ्या ‘या’ गोष्टींची विशेष काळजी; मिळतील अपेक्षित लाभ

असे मानले जाते की दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वास करते आणि व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते.

Shardiya Navratri 2022: नवरात्रीला दुर्गा सप्तशतीचे पठण घ्या ‘या’ गोष्टींची विशेष काळजी; मिळतील अपेक्षित लाभ
जाणून घ्या दुर्गा सप्तशतीचे पठण करताना कोणत्या चुका करू नयेत. (Jansatta)

आज, म्हणजेच २६ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये माँ दुर्गेच्या नऊ रूपांची विधिवत पूजा केली जाईल. नवरात्रीत व्रत करणारी व्यक्ती उपासनेसोबतच दररोज दुर्गा सप्तशतीचे पठण करते. असे मानले जाते की दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वास करते आणि व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. जाणून घ्या दुर्गा सप्तशतीचे पठण करताना कोणत्या चुका करू नयेत.

दुर्गा सप्तशतीमध्ये १३ अध्याय आहेत. यातील ७०० श्लोकांमधून दुर्गा देवीची पूजा केली जाते. या १३ अध्यायांमध्ये माँ दुर्गेच्या तीन चरित्रांबद्दल सांगण्यात आले आहे. दुर्गा सप्तशतीचे पठण करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा.

Shardiya Navratri 2022 Wishes: शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या प्रियजनांना द्या ‘या’ मंगलमयी शुभेच्छा!

  • शास्त्रानुसार ज्या व्यक्तीने नवरात्रीच्या काळात आपल्या घरात कलशाची स्थापना केली असेल त्याच व्यक्तीने दुर्गा सप्तशतीचे पठण करावे.
  • श्री दुर्गा सप्तशती पठण करण्याआधी स्वच्छ ठिकाणी लाल कापड पसरवा. यानंतर पुस्तक ठेवा आणि कुंकू, तांदूळ आणि फुलांनी त्याची पूजा करा. नंतर कपाळाला कुंकू लावून पाठ सुरू करा.
  • श्री दुर्गा सप्तशतीचे पठण सुरू करण्यापूर्वी आणि समाप्तीनंतर ‘ओं ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे’ या मंत्राचा रोज जप करावा. यानंतरच पठण पूर्ण मानले जाते.
  • दुर्गा सप्तशतीचे पठण करताना शरीराबरोबरच मनही स्वच्छ असले पाहिजे. म्हणून पठण करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ कपडे घाला.
  • दुर्गा सप्तशती पठण करण्यापूर्वी शापोद्धार करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्याशिवाय पाठ केले तर ते फळ देत नाही. कारण यातील प्रत्येक मंत्राला वशिष्ठ, ब्रह्माजी आणि विश्वामित्र यांचा शाप मिळाला आहे.
  • दुर्गा सप्तशती पठण करताना प्रत्येक शब्दाचा उच्चार योग्य आणि स्पष्टपणे करा. तसेच, मोठ्या आवाजात पठण करू नका. जर तुम्हाला संस्कृत अवघड वाटत असेल तर तुम्ही हिंदीत पठण करू शकता.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
देशाच्या विविध भागात नवरात्रोत्सव ‘असा’ होतोय् साजरा; जाणून घ्या एका क्लिकवर

संबंधित बातम्या

गजकेसरी राजयोग बनल्याने ‘या’ ३ राशींना प्रचंड धनलाभाचे योग; ३१ डिसेंबरपासून मिळू शकते तुमच्या नशिबाला कलाटणी
‘केंद्र त्रिकोण राजयोग’ बनल्याने ‘या’ राशींचे नशिब पालटणार? २०२३ मध्ये मिळणार प्रचंड धनासोबत श्रीमंतीचे योग
युरिक ऍसिडचा त्रास झटक्यात कमी करा; काजू बदमासह ‘हे’ पाच नट्स करतील अमृतासमान काम
दुपारच्या वेळी झोप घेणे आरोग्यासाठी वाईट आहे का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
२०२३ मध्ये शनिदेव करणार 3 मोठे नक्षत्र बदल! ‘या’ राशींना मिळू शकतो धनलाभ तर ‘या’ राशींना अपार कष्ट

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबईचा कायापालट करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना निर्देश
हार्दिकशी लग्नगाठ बांधल्यानंतर अक्षया भावूक; लग्नाची तारीख कोरलेल्या नखांचा फोटो शेअर करत म्हणली…
Video: “तुम्हाला आरक्षणाच्या माध्यमातून…”; सुनावणीदरम्यान हायकोर्टातील न्यायमूर्तींचा सरकारी अधिकाऱ्याला अजब प्रश्न
IND vs BAN 2nd ODI: मेहदी हसनच्या नाबाद शतकाच्या जोरावर, बांगलादेशचे भारताला २७२ धावांचे लक्ष्य
युरिक ऍसिडचा त्रास झटक्यात कमी करा; काजू बदमासह ‘हे’ पाच नट्स करतील अमृतासमान काम