Headstand During Pregnancy : ३९ आठवड्यांची गर्भवती महिला शीर्षासनासहित प्रगत योगासने करत असल्याचा एक व्हिडिओ ऑनलाइन संमिश्र प्रतिक्रियांना कारणीभूत ठरला आहे. “३९ आठवडे. ९ महिने. मी हा टप्पा असा जगत आहे,” असे आता व्हायरल झालेल्या व्हिडिओवरील कॅप्शनमध्ये लिहिले आहे. अनेक नेटकऱ्यांनी तिच्या लवचिकतेची आणि ताकदीची प्रशंसा केली, तर काहींनी प्रसूतीच्या इतक्या जवळ अशा तीव्र हालचाली सुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला.
याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना नर्चर आयव्हीएफ क्लिनिकमधील स्त्रीरोगतज्ज्ञ आणि आयव्हीएफ तज्ञ डॉ. अर्चना धवन बजाज यांनी सांगितले की, “गरोदरपणाच्या शेवटच्या आठवड्यांमध्ये प्रगत योगासने आणि शीर्षासन करणे प्रत्येकासाठी योग्य नाही आणि त्यात धोके असू शकतात, अगदी ज्या महिला अनेक वर्षांपासून योगाभ्यास करत आहेत त्यांच्यासाठीही.”
नवव्या महिन्यात प्रगत योगासाने का सुरक्षित नाही?(Why advanced yoga poses may not be safe at 39 weeks)
“३९ व्या आठवड्यात म्हणजेच गर्भधारणेच्या नवव्या महिन्यात काही योगासने करणे सुरक्षित नाही. भलेही एखादी महिला कित्येक वर्षांपासून योगा करत असेल तरी हे सुरक्षित नाही.”, असे डॉ. बजाज यांनी स्पष्ट केले.
“शेवटच्या काही आठवड्यांमध्ये शरीरात बरेच बदल होतात, जसे की संतुलन बिघडणे, सांध्यांची लवचिकता कमी होणे आणि गुरुत्वमध्याचे स्थानांतरण होणे. या बदलांमुळे, महिलेला पडून दुखापत होण्याचा आणि/किंवा गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका असू शकतो.”
त्या स्पष्ट करतात की, “गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात वरवर पाहता किरकोळ वाटणारी पडण्याची घटनासुद्धा अनावश्यक धोके निर्माण करू शकते.”
“पडल्यामुळे होणारी दुखापत ही एका निरोगी बाळासाठी एक अनावश्यक धोका आहे, परंतु ती गर्भाशयात असताना होऊ शकते. या टप्प्यावर, शारीरिक कामगिरीवर नव्हे, तर आराम, रक्ताभिसरण, श्वासोच्छ्वास आणि जन्माच्या तयारीवर भर दिला पाहिजे.
शरीर शीर्षासणात पूर्ण उलटे करणे आणि तीव्र ताणण्याचे धोके काय आहेत? (What are the risks of inversions and intense stretching?)
“गरोदरपणाचे शेवटचे काही आठवडे तणावपूर्ण असू शकतात, विशेषतः शीर्षासन करताना जेव्हा शरीर उलटे केले जाते किंवा जास्त ताणले जाते, कारण शरीर आधीच खूप तणावाखाली असते,” असे डॉ. बजाज म्हणतात.
त्या हे देखील सांगतात की, गर्भधारणेच्या काळात हार्मोन्स नैसर्गिकपणे लिगामेंट सैल करतात आणि सांध्याची लवचिकता वाढवतात, त्यामुळेच शरीर ताणणारे तीव्र व्यायाम करणे धोकादायक आहे.
शरीर ताणणारे तीव्र व्यायामामुळे लिगामेंट्स अति जास्त प्रमाणात ताणले जातात, कारण गर्भधारणेदरम्यान हार्मोन्स सांध्यामध्ये अधिक लवचिकतान निर्माण करतात त्यामुळे स्थायूंवर ताण(muscle strains) आणि श्रोणीची( pelvic) अस्थिरता देखील
शीर्षासन करणे इतर चिंता वाढण्याचे कारणही ठरू शकते. शरीर उलटे झाल्याने लोकांना चक्कर येते, अस्वस्थता जाणवते आणि त्यांचे संतलून बिघडते आणि त्यांचा रक्तदाब बिघडू शकतो.

कोणत्या स्थितीमध्ये शीर्षासन किंवा शरीर उलटे करणे सुरक्षित मानले जाते.(Are there situations where inversions may be considered safe?)
सुरक्षितेचा प्रश्न येतो तेव्हा ते अत्यंत वैयक्तिक(प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळे) असू शकते असे डॉ. बजाज सांगतात.
ज्या महिला गर्भधारणेच्या पुर्वीपासून नियमितपणे शीर्षासन करतात, ज्यांना कोणतेही वैद्यकिय समस्या नाही आणि जिला तिच्या प्रसूती तज्ज्ञाने मान्यता दिली आहे, त्या महिला कधीकधी काळजीपूर्वक आणि कौशल्याने शीर्षासन व्यायाम किंवा त्यात केलेले बदल सुरू ठेवू शकते.
मात्र, त्या यावर जोर देतात की, अनुभवी व्यायामकर्त्यांनीसुद्धा सावधगिरीने पुढे जावे. “शेवटचे काही आठवडे हे सहसा खूप जास्त करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी स्थिरता, सजग हालचाली आणि ऊर्जेचे संवर्धन यावर लक्ष केंद्रित करण्याचा काळ असतो.” नवव्या महिन्यात व्यायाम करणे सुरक्षित आहे की नाही हे कसे ओळखावे
“नवव्या महिन्यासाठी मुख्य मार्गदर्शक तत्त्व म्हणजे हालचाल करताना आणि नंतर शरीराला कसे वाटते,” असे डॉ. बजाज सांगतात. वेदना किंवा असामान्य लक्षणे जाणवल्यास व्यायाम ताबडतोब थांबवण्याचा सल्ला त्या देतात.
“जर व्यायामामुळे वेदना, चक्कर येणे, धाप लागणे, कळा येणे, ओटीपोटात दाब जाणवणे किंवा अस्वस्थता जाणवत असेल, तर व्यायाम ताबडतोब थांबवा.”
एखादी क्रिया योग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी एक सोपे मार्गदर्शक तत्त्व मदत करू शकते. “गरोदरपणात व्यायाम करताना स्त्रीला सामान्यपणे बोलता आले पाहिजे. हालचाली आधार देणाऱ्या असाव्यात, थकवणाऱ्या नसाव्यात,” असे त्या स्पष्ट करतात.
गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यातील सर्वात सुरक्षित व्यायाम (The safest exercises during late pregnancy)
डॉ. बजाज यांच्या मते, नवव्या महिन्यात करता येणाऱ्या काही सर्वात सुरक्षित व्यायामांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
- चालणे
- प्रसूतिपूर्व योग
- पेल्विक फ्लोअरचे व्यायाम
- हलके स्ट्रेचिंग
- श्वासोच्छ्वासाचे व्यायाम
- पोहोणे (आरोग्य सेवा प्रदात्याच्या परवानगीने)
टीप – हा लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. कोणताही व्यायाम कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
